देशात कोरोना मृत्युचे तांडव मोदींच्या चूकीच्या नियोजनामुळे : कॉंग्रेस नेत्यांचे आक्रमक प्रत्युत्तर

मुंबई  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टिकेनंतर राज्यातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांच्या तुलनेत कॉंग्रेस नेते आक्रमकपणे मोदी यांच्या वक्तव्यावर तुटून पडल्याचे दिसत आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये काँग्रेसनेच माणूसकीचे नाते जपले, लोकांकडे पैसे नव्हते ते चालत घरी निघाले होते. काँग्रेसने मदत केली म्हणून त्यांना शाबासकी दिली पाहिजे. अश्या शब्दात काँग्रेसने मजुरांना स्थंलातर करायला लावले, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टिकेला महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिले आहे.

पंतप्रधान कमी आणि भाजपचे प्रचारक जास्त

पटोले म्हणाले की, ‘रेल्वेचा कंट्रोल तर तुमच्याकडेच होता. रेल्वे तुम्हीच सुरु केली. उत्तर प्रदेशमधील गंगेतील प्रेतांचा खच पडला, तिकडे कोरोना नियंत्रण करता आले नाही, हे पाप झाकण्याकरता काँग्रेसवर आरोप केले जातात. नरेंद्र मोदी पंतप्रधान कमी आणि भाजपचे प्रचारक जास्त वाटतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंवेदनशिलतेची हद्द पार केली आहे.

मोदींच्या चूकीमुळे देशात कोरोना मृत्युचे तांडव

लॉकडाऊन सुरु केले तेव्हा रेल्वे,  बस बंद केल्या होत्या. तेव्हा लोकांचे हाल झाले महिनाभर लोकांकडे रोजगार नव्हता, पैसे नव्हते. गोव्यात साडेआठ हजार लोक विनाऑक्सिजन मरण पावले. भाजपच्या लोकांना तिथे उभे करत नाही. देशात कोरोना मृत्युचे तांडव जे पहायला मिळाले ते मोदींच्या चूकीच्या नियोजनामुळे पहायला मिळाले. भाजप उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणूकीत पराभूत होते, त्यामुळे अश्या प्रकारचे आरोप लावले जातात, अशी टीका पटोले यांनी मोदींवर केली आहे.

केंद्र सरकारमुळे कोरोना वाढीस लागला

मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर देताना म्हणाले की,  आम्ही कोरोना काळात मुंबईत काम करणारे उत्तर प्रदेश, बिहारच्या मजूरांना गावी जावेत यासाठी पैसे भरून ट्रेनने त्यांना पाठवले. अनेक मजूर चालत आपल्या गावी जात होते, परंतु केंद्राने काहीच केले नाही. आमच्यामुळे ते गावी व्यवस्थित जाऊ शकले, त्यानी हे लक्षात घ्यावे. किमान महाराष्ट्रात अनेक प्रेते वाहत जात असल्याचे चित्र पाहिला नाही मिळाले.  ज्यावेळी कोरोना संकटाबाबत राहुल गांधी बोलत होते, त्यावेळी केंद्राने त्याकडे दुर्लक्ष केले ज्यावेळी महारष्ट्र सरकार अंतर राष्ट्रीय विमाने बंद करण्याबाबत विनंती करत होते, त्यावेळी देखील यांनी दुर्लक्ष केले. माझा स्पष्ट आरोप आहे की, केंद्र सरकार मुळे महाराष्ट्रात मोठया प्रमाणात कोरोना वाढीस लागला असेही जगताप म्हणाले.

Social Media