Corona : पंजाबमधील वैद्यकीय महाविद्यालयीन डॉक्टरांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम!

लुधियाना : कोरोना संसर्गात केवळ मोठ्या संख्येने रूग्णांचा जीव गेलेला नाही तर या विषाणूमुळे डॉक्टरांच्या मानसिक आरोग्यावर देखील मोठा परिणाम झाला आहे. दयानंद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागाने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, कोरोना कालावधीत ६७ टक्के कनिष्ठ डॉक्टर चिंता आणि नैराश्याने ग्रस्त आहेत. या विभागाद्वारे पंजाबमधील ९ वैद्यकीय महाविद्यालयाच्या २६० रहिवासी आणि पीजी विद्यार्थ्यांसह ऑनलाइन अभ्यास करण्यात आला. यामध्ये १७० महिला आणि इतर सर्व पुरूष डॉक्टरांचा समावेश होता. विभागाचे प्रमुख आणि प्रो. रंजीव महाजन यांनी सांगितले की, वैद्यकीय महाविद्यालयाच्या रहिवासी आणि पीजी विद्यार्थ्यांमध्ये चिंता अधिक प्रमाणात वाढली आहे. तर कोव्हिडपूर्वी जेव्हा पंजाबमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तरूण डॉक्टरांच्या तणावासंदर्भात अभ्यास केला होता तेव्हा केवळ १७ टक्के रहिवासी आणि पीजी विद्यार्थ्यांमध्ये तर ११ टक्के डॉक्टरांमध्ये चिंता दिसून आली.

कोरोना : पंजाबमधील ६७ टक्के महाविद्यालयीन डॉक्टर चिंता आणि नैराश्याने ग्रस्त!

Corona: 67 per cent of college doctors in Punjab suffer from anxiety and depression!

त्यांनी सांगितले की, मेडिकलचे विद्यार्थी दीर्घकाळ सेवा आणि रूग्णालयातील कोरोनाच्या हाहाकारमुळे तणावात आले आहेत. हे डॉक्टर आयसीयू आणि आयसोलेशन मधील रूग्णांच्या अगदी जवळ असतात, त्यामुळे संसर्गाच्या भयानक परिस्थितीमुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यांच्या सततच्या कामाबरोबरच त्यांच्या परीक्षा देखील झालेल्या नाहीत. आणि सेवेत असताना दररोज अनेक रूग्णांचा मृत्यू झाला, जे कमी वयातील डॉक्टरांनी प्रथमच पाहिले आहे.

८० टक्के लसीकरणाद्वारे कोव्हिड-१९ व्हेरिएंट्सची जोखीम कमी केली जाऊ शकते : डब्ल्यूएचओ – 

डॉ. रंजीव महाजन यांचे म्हणणे आहे की, अभ्यासात आम्हाला असेही दिसून आले की, कनिष्ठ डॉक्टरांमध्ये चिंता आणि तणावाचे कारण रूग्णांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया आहे. उपचारा दरम्यान रूग्णांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची प्रतिक्रिया अत्यंत भयानक असते. अनेकदा रूग्ण बरे झाल्यानंतर श्रेय देवाला दिले जाते, परंतु मृत्यू झाल्यास दोष डॉक्टरांना दिला जातो, ज्याचा मेंदूवर खोलवर परिणाम होतो. याव्यतिरिक्त लॉकडाऊनमुळे डॉक्टरांचा कंम्पूटर, लॅपटॉप आणि फोनच्या स्क्रीनवर बघण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे दुःख, अस्वस्थता, चिडचिडेपणा आणि नैराश्य आले आहे.

डॉ. महाजन यांनी विदेशात झालेल्या अभ्यासाचा देखील हवाला दिला आहे. त्यांनी सांगितले की, चीनमध्ये चिंता आणि तणावाची प्रकरणे २२ टक्के आढळली आहेत. तर, ३५ टक्के मेडिकलचे विद्यार्थी तणावात होते. ही संख्या भारतापेक्षा खूप कमी आहे. इतर देशांमध्ये देखील ही आकडेवारी कमी आहे.
Corona Effect: Deteriorating mental health of medical college doctors in Punjab, anxiety in 67 percent.


’या’ फळांचे सेवन केल्याने यूरिक ऍसिड राहते नियंत्रित! –

यूरिक ऍसिड नियंत्रित करण्यासाठी ‘या’ फळांचे करा सेवन….

दुधाच्या मलईचे इतर आरोग्य फायदे –

अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेली दूधाची मलई त्वचा आणि आरोग्यासाठी सर्वोत्तम!

Social Media