आता बाजारपेठांमध्येही होणार कोरोना चाचणी

नागपूर दि 8 : नागपुरातील सर्वच बाजारात नागपूर महापालिकेतर्फे राबविण्यात येत आहे. यात विशेष कोरोना चाचणी मोहीम राबविण्यात येत आहे.

नागपुरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागपूर महापालिकेतर्फे सर्व झोन अंतर्गत येणाऱ्या विविध बाजारांमध्ये नागरिकांची कोरोना चाचणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे . या विशेष मोहिमेत खरेदीसाठी बाजारात येणाऱ्या नागरिकांची RTPCR किंवा अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे . या मोहिमेत नागपूर महापालिकेचा आरोग्य विभागातर्फे शहरातील सर्व मुख्य बाजारांमध्ये कोरोना चाचणींचे विशेष कॅम्प लावण्यात आले असून या कॅम्प ला नागरिकांचाही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभत आहे.

नागरिक स्वयंस्फूर्तीने स्वतःची कोरोना चाचणी करीत असल्याचे दिसत आहे . महत्वाचे म्हणजे अनेक नागरिकांना सर्दी, खोकला, ताप असतांनाही स्वतःची कोरोना चाचणी न करता बाजारात फिरत असल्याचे आरोग्य विभागाला लक्षात आल्यानंतर मनपा तर्फे ही कोरोना चाचणीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

Social Media