मुंबई: Hiv प्रमाणेच कोरोनाची चाचणी(corona test) अत्यावश्यक करणं गरजेचं झालं आहे , त्यादृष्टीने विचार करतोय असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे, लसीकरणाचा वेग सध्या मंदावलाय , नागरिक त्यासाठी फार पुढे येत नाहीत , पण त्यांना प्रवृत्त करण्याची गरज आहे असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी
पत्रकार दिवाळी संमेलन कार्यक्रमात ते बोलत होते .
तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही , ती येणारच नाही असंही म्हणता येत नाही, कोरोनाचा प्रकार बदलतोय त्याचप्रमाणे राजकीय आरोपांचाही बदलतोय , मात्र कोरोनाची जास्त काळजी करायला हवी असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सरकारी यंत्रणा काम करताहेत पण त्यांना मर्यादा आहेत , नागरिकांनी जास्त जागरूक राहिलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं.
राज्यात सव्वा लाख ऑक्सिजन बेडची उपलब्धता तयार केली आहे , कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 80 हजारांना ऑक्सिजनची गरज लागली तरी तो बाहेरून आणावा लागला , सगळ्या सव्वा लाख रुग्णांना लागला असता तर काय झालं असतं याचा विचार करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.
मंत्रालयात जात नाही असा आपल्यावर आरोप होतो पण काम सगळ्यांचं होतं आहे, ते थांबलेलं नाही , उगाच सगळीकडे बिनकामाचं फिरण्यापेक्षा एका ठिकाणी बसून मी काम करतो असा टोला त्यांनी यावेळी लगावला. आता जाईन मंत्रालयात , आधीच्या लोकांचे प्रताप निस्तरायचे आहेत असं ते म्हणाले.
मंत्रालयातील वॉर रूम चे नाव बदलून संकल्प कक्ष असं केलं आहे, ज्या योजना तयार केल्या आहेत त्या कोरोनाच्या आपत्तीमुळे थांबल्या आहेत , आता मात्र सुरु करू.
लहान मुलांना लस देण्याच्या दृष्टीने अजून लस आपल्याकडे आलेली नाही , मात्र याबाबत पालकांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे असंही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.
Chief Minister Uddhav Thackeray has opined that the corona test needs to be made essential like Hiv, the pace of vaccination has slowed down at present, citizens do not come far ahead for it, but they need to be motivated, Chief Minister Thackeray said.