कोरोनाचा किशोरवयींवर अधिक तणाव, मुलांच्या तुलनेत मुलींवर अधिक प्रभाव : अभ्यास

न्यूयॉर्क : जगातील कदाचितच असा कोणता कोपरा असेल जो कोरोना (corona) संसर्गापासून दूर राहिला असेल. कोरोनाने प्रत्येकाचे जीवन वाईटरित्या प्रभावित केले आहे. प्रत्येक वयोगटातील लोकांवर याचा परिणाम झाला आहे. विशेषतः किशोरवयीन मुलांवर याचा अधिक परिणाम दिसून आला आहे. अशी बाब एका नवीन अभ्यासातून(study) समोर आली आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, किशोवयींवर विशेषतः मुलींवर कोरोनाचा अधिक नकारात्मक प्रभाव पडला आहे आणि त्यांचा तणाव देखील वाढला आहे. सुमारे ५९ हजार सहभागींवर करण्यात आलेला हा अभ्यास द लॅन्सेट सायकियाट्री मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. अभ्यासात १३ ते १८ वयोगटातील मुले आणि मुलींच्या मानसिक आरोग्यावर कोरोनाच्या परिणामात विषमता आढळून आली. सोबतच संसर्गापूर्वीच्या मानसिक आरोग्याची तुलना वर्तमान स्थितीशी करण्यात आली. या तुलनेनंतर असे दिसून आले की संसर्गाने मुलींच्या मानसिक आरोग्याला अधिक प्रभावित केले आहे.

दीर्घकाळापासून मादक पदार्थांचे सेवन

Prolonged drug abuse

या अभ्यासासाठी संशोधकांनी ५९ हजार सहभागींना समाविष्ट केले. यामध्ये त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली की ते गेल्या दीर्घकाळापासून मादक पदार्थांचे सेवन करत होते किंवा नाही. याशिवाय सध्या त्यांना कसे वाटत आहे आणि मादक पदार्थांचे सेवन करत आहेत किंवा नाही? या माहितीची तुलना संशोधकांनी किशोरवयींच्या मानसिक आरोग्यावर करण्यात आलेल्या पूर्वीच्या अभ्यासाशी केली. या अभ्यासातून आणखी एक बाब समोर आली.
संशोधकांच्या मते, संसर्गादरम्यान १५ ते १८ वयोगटातील किशोरवयींमध्ये सिगारेट, ई-सिगारेट (e-cigarette)आणि अल्कोहोलच्या वापरात देखील कमतरता दिसून आली. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाचे संशोधक जान एलेग्रांटे यांच्या मते, किशोरवयींमध्ये कोरोना संसर्गादरम्यान मादक पदार्थांच्या वापरात कमी येणे हा एक अनपेक्षित फायदा आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांचे क्वारंटाईनमध्ये (quarantine) राहणे आहे.

संशोधकांच्या मते, किशोरवयीन मुलांवर यापूर्वी देखील काही अभ्यास करण्यात आले होते, ज्यात असे दिसून आले होते की मादक पदार्थांचा वापर आणि त्याच्यातील तणाव दोन्ही वाढत आहे. तथापि, संसर्गादरम्यान जेव्हा नवीन माहितीशी आधीच्या माहितीसोबत तुलना करण्यात आली तेव्हा असे समजले की त्यांच्या मादक पदार्थांच्या वापरात कमी आली आहे, परंतु मानसिक आरोग्यावर आणखी परिणाम झाला आहे.
Covid-19: Corona making teenagers more stressed, more effect seen on girls than boys.


लोकांना कोरोना संसर्ग झाला परंतु कोव्हिडमुळे त्यांचा मृत्यू झाला नाही : एम्स 

लस घेतल्यानंतरही कोरोना संसर्ग झालेल्या कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही : एम्स अभ्यास

Blood Sugar नियंत्रित करण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन…. –

रक्तातील पातळी नियंत्रित करण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन….

Social Media