कोरोनाच्या नवीन लॅमडा व्हेरिएंटचा जगभरातील ३० देशांमध्ये प्रसार, डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक धोकादायक

लंडन : कोरोना विषाणूच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटचा धोका जगभरात वाढत आहे. डेल्टा व्हेरिएंटच्या वाढत्या जोखीमेदरम्यान कोरोना विषाणूचा एक नवीन व्हेरिएंट लॅमडा व्हेरिएंट (Lambda Variant) आढळून आला आहे. यूकेच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, ‘लॅमडा’ नावाचा एक नवीन कोरोना विषाणू स्ट्रेन, डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक धोकादायक आहे. गेल्या चार आठवड्यात ३०हून अधिक देशात शोध लागला आहे.

पेरू देशात आढळलेला कोरोना विषाणूचा(Corona virus) लॅमडा व्हेरिएंट(Lambda variant) जगभरातील वेगवेगळ्या देशात वेगाने पसरत आहे. अहवालानुसार ब्रिटनसह अनेक देश याच्या संपर्कात आले आहेत. यूकेमध्ये आतापर्यंत लॅमडा व्हेरिएंटची सहा प्रकरणे समोर आली आहेत. अहवालानुसार संशोधक याबाबत चिंतीत आहेत की, लॅमडा व्हेरिएंट, डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक संक्रामक असू शकतो. या व्हेरिएंटला C.37 स्ट्रेन म्हणून ओळखले जाते.

Blood Sugar नियंत्रित करण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन…. 

माध्यमांनी पॅन अमेरिकेतील आरोग्य संस्थेच्या हवाल्याने सांगितले की, पेरू देशात मे आणि जून दरम्यान नोंदविलेल्या नवीन कोरोना विषाणूच्या प्रकरणातील नमुन्यांमध्ये लॅमडा व्हेरिएंटचा सुमारे ८२ टक्के भाग आहे. पेरू मध्ये लॅमडा व्हेरिएंटची(Lambda variant) सर्वात अधिक प्रकरणे आढळून आली आहेत.

कोरोनाचा मुलांच्या तुलनेत मुलींवर अधिक प्रभाव : अभ्यास – 

डेल्टा व्हेरिएंटने अजूनही भारतासह जगातील अनेक देशांमध्ये भीती पसरविली आहे. चिंतेची बाब म्हणजे वॅक्सीनच्या परिणामांबद्दल वेगवेगळे अहवाल सातत्याने समोर येत आहेत. अलिकडेच इस्राईलच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, फायझर(Pfizer) लसीचा परिणाम कमी होऊन ६४ टक्के झाला आहे. ही घसरण डेल्टा व्हेरिएंट संसर्गासह समोर आली आहे.
Corona’s new Lambda variant spread in 30 countries of the world, more dangerous than Delta variant.


बीटा स्ट्रेनच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध अधिक प्रभावी आहे फायझर आणि जे एँड जे कंपनीची लस : दक्षिण आफ्रिकी तज्ज्ञ –

बीटा स्ट्रेनच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध अधिक प्रभावी आहे फायझर आणि जे एँड जे कंपनीची लस : दक्षिण आफ्रिकी तज्ज्ञ

जॉन्सन एँड जॉन्सनची वॅक्सीन डेल्टासह इतर कोरोना व्हेरिएंटविरूद्ध प्रभावी : कंपनीचा दावा –

जॉन्सन एँड जॉन्सनची वॅक्सीन डेल्टासह इतर कोरोना व्हेरिएंटविरूद्ध प्रभावी : कंपनीचा दावा

Social Media