झायडस कॅडिलाने १२-१८ वर्षे वयोगटातील मुलांवर केले लसीचे परिक्षण…

नवी दिल्ली : झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila) लसीसंदर्भात केंद्र सरकारद्वारे दिल्ली उच्च न्यायालयात महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. शुक्रवारी केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, १२ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचे परिक्षण पूर्ण झाले आहे. सध्या हे वैधानिक मंजुरीच्या प्रक्रियेत सामील आहे. ही लस १२-१८ वर्ष वयोगटातील मुलांना दिली जाईल.

फायझर आणि मॉडर्नाच्या वॅक्सीनमुळे हृदयाला सूज – 

कोव्हिड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एनके अरोडा यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, झायडस कॅडिलाच्या लसीची चाचणी जवळजवळ पूर्ण झाली आहे जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टमध्ये १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना ही लस देण्याची सुरूवात केली जाऊ शकते. त्यांनी असेही म्हटले होते की, येत्या काळात एक कोटी लस देण्याचे आमचे लक्ष्य आहे. डॉ. एनके अरोडा यांनी असेही सांगितले होते की, आयसीएमआर च्या एका अभ्यासानुसार, तिसरी लाट उशीरा येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडे देशात प्रत्येकाचे लसीकरण (vaccination)करण्यासाठी अजूनही वेळ आहे. अशा परिस्थितीत, आगामी काळात दररोज 1 कोटी डोस देण्याचे आमचे लक्ष्य आहे.

केरळमध्ये झिका विषाणूचा प्रादुर्भाव, १४ प्रकरणांनंतर हाय अलर्ट जारी… – 

यापूर्वी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेमध्ये लस उपलब्ध करण्याच्या स्थितीसंदर्भातील एका प्रतिज्ञापत्रात म्हटले होते की, डीएनए लस विकसित करणाऱ्या झायडस कॅडिलाने १२-१८ वर्षांच्या मुलांवर क्लिनिकल चाचणी पूर्ण केली आहे आणि यास वैधानिक मंजुरी मिळाल्यानंतर ही लस भविष्यात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी उपलब्ध असेल.
Covaccine trial on 12-18 year olds, Center gave information in affidavit given in HC.


कोव्हिड संसर्गामुळे जगभरातील २ कोटी ३० लाख मुले विविध लसींपासून वंचित! –

कोव्हिड संसर्गामुळे जगभरातील २ कोटी ३० लाख मुले विविध लसींपासून वंचित!

युरोपमधील अनेक देशांमध्ये एस्ट्राजेनेका वॅक्सीनच्या भारतीय आवृत्तीला मंजुरी नाही; कंपनी आणि संघात तणाव! –

युरोपमधील अनेक देशांमध्ये एस्ट्राजेनेका वॅक्सीनच्या भारतीय आवृत्तीला मंजुरी नाही; कंपनी आणि संघात तणाव!

Social Media