जिनेव्हा : संयुक्त राष्ट्राच्या जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले आहे की, कोव्हिड-१९ संसर्गामुळे (covid-19 pandemic)सुमारे २ कोटी ३० लाख मुले विविध लसींपासून वंचित राहिली आहेत. जगातील अनेक देशांमध्ये यूएन च्या मदतीने लहान मुलांना पोलिओचा डोस(Polio Dose) आणि गोवर प्रतिबंधक लस(measles prevention vaccine) दिली जाते. परंतु गेल्या वर्षी यामध्ये घट दिसून आली. याचे सर्वात मोठे कारण कोरोना संसर्ग असल्याचे म्हटले जात आहे. जागतिक आरोग्य संस्थेद्वारे असे म्हटले आहे की, संसर्गामुळे संपूर्ण जगभरात सर्वकाही ठप्प झाले आहे. जगातील जवळपास सर्व देश लॉकडाऊनमध्ये आहेत. आरोग्यासंबंधित अत्यावश्यक गोष्टी देखील इतर देशांमध्ये पाठविण्यात खूप अडचणी येत आहेत.
गोवर आजही जगात सर्वात मोठा संसर्गजन्य आजार आहे
Measles is still the largest infectious disease in the world
जागतिक आरोग्य संस्थेचे म्हणणे आहे की, गोवर आजही जगात सर्वात मोठा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार पाच वर्ष वयोगटातील मुलांना होण्याची शक्यता असते. आफ्रिका आणि आशियात याचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचे दिसून येते. याचे कारण आरोग्य सेवाचे इतर देशांच्या तुलनेत कमकुवत असणे हे देखील आहे. संस्थेचे म्हणणे आहे की, संसर्गामुळे पोलिओ लसीकरण कार्यक्रमावरही खूप वाईट प्रभाव पडला आहे. यूएन च्या विविध संस्थांद्वारे तयार केलेल्या वार्षिक अहवालात याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
फायझर आणि मॉडर्नाच्या वॅक्सीनमुळे हृदयाला सूज –
या आहवालात असे म्हटले आहे की, सन २०२० मध्ये भारत आणि नायझेरियामध्ये संसर्गामुळे २.२७ कोटी मुले या लसीपासून वंचित राहिले आहेत. २०१९ मध्ये अशा मुलांची संख्या केवळ ३.७ लाख होती. संस्थेचे म्हणणे आहे की, अफगाणिस्तान, माली, सोमालिया आणि यमनमध्ये मोठ्या संख्येने प्रमाणात गोवरची प्रकऱणे आढळली आहेत. गेल्या वर्षी १.२५ कोटी मुलांना गोवरची पहिली लस मिळाली नाही.
जागतिक आरोग्य संस्थेचे संचालक केट ओ ब्राउन यांनी यासंदर्भात चिंता व्यक्त करत म्हटले आहे की, मुलांचे लसीपासून वंचित राहणे धोकादायक आहे. त्यांच्या मते एका दशकादरम्यान ही सर्वात वाईट परिस्थिती आहे.
covid-19 pandemic put brake on children’s vaccination program, India also mentioned in UN report.
डब्ल्यूएचओने बूस्टर डोस न वापरण्याचे केले आवाहन जाणून घ्या त्यामागील कारण….. –