पहिल्या सत्रात १८,३२४ नागरिकांची कोविड लसीकरण पडताळणी तर १७,७५८ मासिक पास वितरित

मुंबई : मुंबईतील सर्वसामान्‍य नागरिकांना येत्‍या स्‍वातंत्र्य दिनी म्‍हणजेच १५ ऑगस्‍ट पासून उपनगरीय रेल्‍वे प्रवास करण्‍यास मुभा देण्‍याची घोषणा राज्‍याचे मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यानुसार आज बुधवारी सकाळी ७ वाजल्‍यापासून मुंबई महापालि‍का क्षेत्रातील ५३ रेल्‍वे स्‍थानकांवर ३५८ मदत कक्ष सुरु करण्‍यात आले आहेत. दुपारी ३ वाजेपर्यंत १८ हजाराहून अधिक नागरिकांची पडताळणी पूर्ण झाली. तर याच अनुषंगाने आज दुपारपर्यंतच्या पहिल्या सत्रात रेल्वे प्रशासनाद्वारे १७ हजार ७५८ मासिक पासांचे वितरण करण्यात आले आहे.

ज्‍या सर्वसामान्‍य नागरि‍कांना कोविड लशीचे दोन डोस घेतल्‍यानंतर १४ दिवस पूर्ण झाले आहेत, त्‍यांचे लसीकरण अंतिम प्रमाणपत्र व छायाचित्र असणारे ओळखपत्र पडताळण्यात येत आहे. या ऑफलाईन पडताळणीमध्‍ये पात्र ठरलेल्‍यांना रेल्वेकडून मासिक पास दिला जात असून त्याआधारे उपनगरीय रेल्‍वे प्रवासाची मुभा देण्‍यात आली आहे.

आज सकाळी ७ वाजेपासून मुंबईतील ५३ रेल्वे स्थानकांवर ही प्रक्रिया सुरु झाली आहे.
दरम्यान, मुंबई महापालिका क्षेत्रात एकूण ५३ रेल्वे स्थानकांवर मिळून ३५८ मदत कक्ष कार्यान्वित झाले आहेत. आज दुपारी ३ वाजेपर्यंतच्या पहिल्या सत्रात या सर्व ५३ स्थानकांवर मिळून एकूण १८ हजार ३२४ रेल्वे प्रवाशांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. या पडताळणीनंतर नागरिकांना मासिक पास देण्याच्या कार्यवाहीची सुरुवात देखील रेल्वे प्रशासनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार आज दुपारपर्यंत पहिल्या सत्रात १७ हजार ७५८ मासिक पास देण्यात आले आहेत. यामध्ये मध्य रेल्वेद्वारे १२ हजार ७७१, तर पश्चिम रेल्वेद्वारे देण्यात आलेल्या ४ हजार ९८७ मासिक पासांचा समावेश आहे.

दररोज सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सलग २ सत्रामध्‍ये मदत कक्ष कार्यरत असणार आहेत. यामुळे विनाकारण गर्दी न करता नागरिकांनी आपल्‍या घराजवळील रेल्‍वे स्‍थानकांवर पडताळणीकरिता जावे,

Social Media