नवी दिल्ली : 16 जानेवारीपासून देशभरात कोरोनाविरूद्ध लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. यामुळे देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने लस कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लस पूर्णपणे सुरक्षित घोषित केल्या आहेत.
आयसीएमआरच्या एपिडेमिओलॉजी अँण्ड कम्युनिकेशनल डिसीज डिव्हिजनचे प्रमुख आणि समीर पांडा म्हणाले की, “कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्हीही लसी सुरक्षित आहेत आणि त्याच्या सुरक्षिततेवर शंका घेण्याचे कोणतेही कारण असू नये. दोन्ही लसींविषयीचे समज व गैरसमज दूर करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.
Tag-Covishield and Covaxin vaccines are completely safe/ACMR