भारतात कोविशील्ड लस घेतलेले लोक आता सहजरित्या करू शकतात यूरोपमधील ‘या’ नऊ देशांचा दौरा!

मुंबई : दोन वर्ष घरी बसून लोक आता कंटाळले आहेत ते बाहेर पडण्याची संधी शोधत आहेत. काही लोक एकिकडे मज्जा-मस्ती करण्यासाठी बाहेर पडत आहेत तर दुसरीकडे काही लोक काम करण्यात व्यस्त आहेत. या दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की भारतात कोविशील्डचे दोन्ही डोस घेतलेले लोक आता सहजरित्या यूरोपमधील काही विशेष देशांचा दौरा करू शकतात.

१ जुलै रोजी यूरोपमधील ९ देशांनी कोविशील्ड वॅक्सीनला ‘ग्रीन पास’ दिला आहे. याचा अर्थ असा आहे की कोविशील्ड वॅक्सीनला तेथे मंजूर लसींच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यापैकी एक देश एस्टोनियाने भारत बायोटेकद्वारे बनलेल्या कोवॅक्सीनला देखील व्हिसा देण्यासंबंधित नियमात सामील केले आहे.

ग्रीन पास मिळाल्याने, कोविशील्ड चे दोन डोस घेतलेल्या लोकांना आता कोरोनाच्या नियम-कायद्यांमध्ये थोडीशी शिथिलता मिळेल. यापूर्वी ग्रीन पास न मिळाल्याने लोक यूरोपची यात्रा करू शकत नव्हते. यूरोपच्या या ९ देशांमध्ये जर्मनी, स्लोव्हेनिया, ऑस्ट्रिया, ग्रीस, आईसलँड, आयर्लंड स्पेन आणि स्वित्झर्लंडचा समावेश आहे. याबाबत भारताने संघाकडे आवाहन केले होते की त्यांनी कोविशील्ड आणि कोवॅक्सीनवर स्वतंत्र्यपणे विचार करावा. त्यानंतर हा निर्णय भारताच्या बाजूने आला.

नैनीतालमध्ये दीड महिन्यानंतर पुन्हा रज्जूमार्ग सुरू….. – 

भारताने यूरोपियन मोडिकल संस्थेला सांगितले आहे की, भारतात लसीकरण झालेल्या लोकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी कोविन पोर्टलवर केली जाऊ शकते. भारताने असेही सांगितले की, ते देखील ग्रीन पास घेऊन येणाऱ्या लोकांना अनिवार्य क्वारंटाईनपासून सूट देतील.

वॅक्सीन टूरिझममुळे पर्यटनाला फायदा! – 

यूरोपियन संघाच्या यूरोपियन मेडिसिन संस्थेने (ईएमए) यापूर्वी केवळ चार कोव्हिड-१९ लसींना ग्रीन पाससाठी परवानगी दिली होती. यामध्ये बायोएनटेक-फायझरची कॉमिरनटी, मॉडर्ना, ऑक्सफोर्ड-एस्ट्रेजेनेकाची वॅक्सीजेव्हेरिया आणि जॉन्सन एँड जॉन्सनची ‘जानसेन’चा समावेश आहे.
Those applying covishield Vaccine in India will now be able to visit these 9 countries of Europe without any worries.


यूपी : बिठूर शहराची पर्यटनाच्या दृष्टीकोनातून होणार सुधारणा! –

यूपी : १०० कोटींच्या योजनेंतर्गत इको टूरिझमला प्रोत्साहन देणार बिठूर शहर….

पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी ‘फागू’ हे ठिकाण सर्वोत्तम! –

पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी ‘फागू’ हे ठिकाण सर्वोत्तम!

Social Media