मुंबई : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांनी गृहविलगीकरणाचे नियम मोडल्यास त्यांच्या वर फौजदारी तसेच न्यायालयीन कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल (Iqbal Singh Chahal)यांनी दिली.
परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी महानगरपालिकेने आदर्श कार्यप्रणाली तयार केली आहे. त्यासाठी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस विलगीकरणाात राहायचे आहे .ते विलगीकरणाात आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी पालिकेचे पथक दिवसातून पाचवेळा फोन वरुन संपर्क साधणार आहेत. तसेच प्रत्यक्ष घरी भेट ही देणार आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअरही तयार केले जाणार आहे. गृहविलगीकरणाचे नियम मोडणाऱ्यांवर फौजदारी तसेच न्यायालयीन कारवाई करण्यात येणार आहे.
महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज हे एसओपी जाहीर केले आहेत. यात मुंबई विमानतळ प्रशासना पासून पालिकेच्या आरोग्य सेविकां पर्यंत प्रत्येक टप्प्यावर जबाबदारीचे वाटप केले आहे.गृहविलगीकरणाचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.
गृहविलगीकरणा बाबत खातरजमा करताना रुग्णांच्या प्रकृतीचीही नियमीत विचारपुस केली जाणार आहे.-पालिकेच्या आरोग्य केंद्रातील पथक या प्रवाशांच्या घरी नियमीत भेटी देणार आहे.-सातव्या दिवशी प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी होईल याचीही खबरदारी घेतली जाईल.
प्रत्येक प्रभागात दहा रुग्णवाहीका प्रत्येक प्रभागात दहा रुग्णवाहिका तयार असतील अशी खात्री करुन ठेवण्याचे निर्देश आयुक्त चहल यांनी प्रशासनाला दिले आहे.
Municipal commissioner Iqbal Singh Chahal informed that criminal and court proceedings will be taken against passengers coming from abroad if they break the rules of home segregation.