5 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील 3 प्रसिद्ध जोतिर्लिंग मंदिरांमध्ये “सांस्कृतिक कार्यक्रमाचे” आयोजन

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 नोव्हेंबर 2021 रोजी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात पूजा करून श्री आदि शंकराचार्यजींच्या मूर्तीचे जीर्णोद्धार आणि अनावरण करतील. यानिमित्ताने 5 नोव्हेंबर 2021 रोजी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे 12 जोतिर्लिंग, चारधाम आणि आदि शंकराचार्यांच्या जन्मस्थानी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच शृंखलेत, 5 नोव्हेंबर 2021 रोजी साऊथ सेंट्रल झोन कल्चरल सेंटर, नागपूर यांनी महाराष्ट्रातील 3 जोतिर्लिंग मंदिरांमध्ये “सांस्कृतिक कार्यक्रमाचे” आयोजन करण्यात आले आहे..

5 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता, चिन्मय देशपांडे आणि कलाकार “कीर्तन”, पंडित सुवीर मिश्रा यांचे “रुद्रवीणा वादन”, श्रीमती विद्या देशपांडे यांचे “शिवतांडव नृत्य” भीमाशंकर मंदिर, पुणे येथे सादर करतील.

5 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता घृष्णेश्वर मंदिर, वेरूळ, औरंगाबाद येथे शरद कुमार दांडगे यांचे “ओम पंचनांद” (सोलो तालवाद्य कचेरी),  सविता मुळे आणि कलाकार यांचे “कीर्तन”,  अनुष्का घुगे आणि कलाकार यांचे भगवान शिव पूजन “कथ्थक बॅले” वर आधारित सादर करतील.

दिनांक 5 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता प्रभंजन भगत आणि कलाकार (नादब्रह्म) “कीर्तन”, श्रीमती भक्ती देशपांडे आणि कलाकार (शिवस्तुती) “कथ्थक” त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक येथे दुपारी 12.00 वाजता सादर होतील.

या तिन्ही कार्यक्रमांच्या सादरीकरणापूर्वी सकाळी 9 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिरातील पूजा, श्री आदि शंकराचार्यांच्या समाधी स्थळाचा जीर्णोद्धार आणि त्यांच्या मूर्तीचे अनावरण यांचे थेट प्रक्षेपण भीमाशंकरवरून करण्यात येईल. भीमाशंकर मंदिर, घृष्णेश्वर मंदिर आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे..

Social Media