CWG 2022: जेरेमी लालरिनुंगाने देशासाठी सुवर्ण जिंकले!

नवी दिल्ली : भारताच्या जेरेमी लालरिनुंगा (Jeremy Lalrinunga )याने बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Birmingham Commonwealth Games 2022)मध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. पुरुषांच्या 67 किलो गटात आपले वर्चस्व कायम ठेवत त्याने 140 किलो स्नॅच आणि 160 किलो क्लीन अँड जर्कमध्ये एकूण 300 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेतील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. विशेष बाब म्हणजे बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आतापर्यंत पाच पदके जिंकली आहेत. भारताने ही सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये जिंकली आहेत.

वेटलिफ्टिंगच्या 67 वजनी गटात सुवर्णपदक पटकावणाऱ्या जेरेमीने स्नॅच स्पर्धेत 140 किलो वजनाचा नवा विक्रम केला. तसेच क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो वजन उचलले आणि एकूण 300 किलो वजन उचलले. कॉमनवेल्थ गेम्समधला हाही नवा विक्रम आहे. या स्पर्धेतील शेवटच्या प्रयत्नात जेरेमी अयशस्वी ठरला. मात्र तरीही त्याने बर्मिंगहॅममध्ये भारताचा तिरंगा फडकवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

जेरेमीची  कामगिरी

जेरेमी मूळचा आयझॉल, मिझोरामचा(Mizoram) आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील त्याचे हे पहिलेच वर्ष आहे. यापूर्वी 2018 मध्ये त्याने युवा ऑलिम्पिकमध्ये 62 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. एवढेच नाही तर गेल्या वर्षी झालेल्या ६७ वजनी गटात सुवर्णपदकही पटकावले होते.

Social Media