हिवाळ्यात दुधासोबत खजूराचे सेवन करणे फायदेशीर, संसर्गजन्य आजार ठेवतो दूर

मुंबई :  आजच्या धावपळीच्या आयुष्यात लोकांचा आहार पूर्वीसारखा पौष्टिक आणि सकस नाही राहिला. यामुळेच लोकांना अनेक प्रकारचे त्रास आणि आजारांना सामोरं जावं लागत आहे. शरीरात पोषकतत्वे नसल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्याही वाढत आहेत. परंतु जर आहारात थोडासा बदल केला गेला तर हिवाळ्याच्या हंगामातही तुमचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होऊ शकते….

आहार तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की हिवाळ्यात मेवा खाल्याने हंगामी आणि इतर संसर्गजन्य रोगांपासून बचाव करू शकता येतं. यामध्ये बदाम, काजू आणि अक्रोड खाण्याचे फायदे सर्वांना माहिती आहेत. याशिवाय खजूर हा एक महत्वाचा घटक आहे त्यामुळे खाणे देखील खूपच फायदेशीर ठरू शकते, याशिवाय शरीरातील दुर्बलपणा दूर करून उर्जा देखील प्रदान करण्याचं काम करतं.

खजूर खाण्याचे फायदे

उच्च फायबर सामग्रीद्वारे बद्धकोष्ठतावर मात केली जाते.

रात्री भिजवून आणि सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाणे देखील फायद्याचे आहे.

खजूरमध्ये जीवनसत्त्वे, साखर आणि प्रथिने भरपूर असतात.

खजूर खाल्ल्याने डोळ्यांचा प्रकाश वाढतो आणि रातआंधळेपणाच्या रुग्णांसाठीही ते फायदेशीर आहे.

खजूरमध्ये खनिजे असतात, जे हाडे मजबूत करतात.

हे नियमित खाल्ल्याने त्वचेचे आजारही बरे होतात आणि चेहर्‍यावरील चमक कायम राहते.

खजूर हे दुधात, खीर आणि भिजवून देखील खाल्या जाऊ शकतो. हिवाळ्यात दुधाचे सेवन केल्यास हंगामी रोग टाळता येतात. याशिवाय हे सकाळी आणि संध्याकाळी देखील खाल्ले जाऊ शकते.

Tag- dates

 

Social Media