स्वरा भास्करला जिवे मारण्याच्या धमक्या; मुंबई पोलिसांनी सुरू केला तपास

मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्करला (Swara Bhaskar)जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. स्वरा भास्करला एका पत्राद्वारे ही धमकी मिळाली आहे. धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एका अधिकाऱ्याने  ही माहिती दिली. हे पत्र अभिनेत्रीच्या वर्सोवा येथील निवासस्थानी पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. हे पत्र मिळाल्यानंतर स्वरा भास्करने दोन दिवसांपूर्वी वर्सोवा पोलिस स्टेशन गाठले आणि अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली, असे अधिकाऱ्याने सांगितले.

“फिर्यादीच्या आधारे, आम्ही अज्ञात व्यक्तींविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे,” ते म्हणाले, तपास सुरू आहे. वीर सावरकरांचा अपमान देशातील तरुण खपवून घेणार नाही, असे हिंदीत लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.


JugJugg Jeeyo box office: ‘जुग जुग जिओ’ ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

Social Media