‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ पुस्तिकेचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

नागपूर : महाराष्ट्र राज्याचे गेली सव्वा दोन वर्ष कर्तव्यनिष्ठ आणि लोकप्रिय मुख्यमंत्री राहिलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदावरील कारकिर्दीचा लेखाजोखा मांडण्यात आलेल्या ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन'(Dedicated to common man) या छोटेखानी कॉफी टेबल बुक चे प्रकाशन नागपूर विधान भवन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुस्तकाच्या सुबक आणि सुटसुटीत मांडणी बद्दल समाधान व्यक्त केले तसेच पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेले जनताभिमुख लोकप्रिय निर्णय, या निर्णयांचा राज्यातील जनतेवर झालेला सकारात्मक परिणाम आणि यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला रेकॉर्ड ब्रेक यश मिळाले आणि त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी आधी घटक पक्षांची पुन्हा सत्ता आली.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो की बळीराजा कृषी पंप विज बिल सवलत योजना असो , एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या एकापाठोपाठ एक अशा लोकप्रिय , धडाकेबाज निर्णयामुळे गेल्या काही दशकातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा सातत्याने उल्लेख होत राहिला. डेडिकेटेड टू कॉमन मॅन या छोटेखानी कॉपीटेबल बुक मध्ये एकनाथ शिंदे यांच्या अशाच लोकप्रिय आणि धडाकेबाज निर्णयांवर प्रकाशझोत टाकण्यात आला असून त्यांंच्या राजकीय कारकीर्दीचा आलेखही मांडण्यात आला आहे. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक वरिष्ठ पत्रकार राजेश कोचरेकर , विधिमंडळातील ज्येष्ठ पत्रकार आणि अभ्यासू विश्लेषक किशोर आपटे या दोघांचे अमूल्य व भरीव योगदान या उपक्रमामध्ये आहे. पुस्तकाची संकल्पना , निर्मिती आणि संपादन जेष्ठ पत्रकार सुनिल जावडेकर यांनी केले आहे.

 

 

शिंदे कडून ठाकरेंवर टिका फडणवीसांकडून सर्वांगिण विकासाची हमी!

Social Media

One thought on “‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ पुस्तिकेचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *