‘राधे’ चित्रपटासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने दिला मोठा आदेश!

नवी दिल्ली : ईदच्या निमित्तीने बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan)प्रदर्शित झालेला चित्रपट ‘राधे यूअर मोस्ट वॉन्टेड भाई’(‘Radhe Your Most Wanted Bhai’) या चित्रपटा संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा आणि महत्वपूर्ण आदेश दिला आहे. सलमान खान अभिनीत चित्रपट ‘राधे यूअर मोस्ट वॉन्टेड भाई’ च्या पायरेटेड प्रतींना अनधिकृतपणे सामाईक करणाऱ्या तसेच संग्रहीत, प्रसारित आणि विक्री करणाऱ्यांचे अकाउंट त्वरित निलंबित करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने वॉट्सऍपला आदेश दिले आहेत. सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायाधीश संजीव नरूला यांच्या खंडपीठाने अंतिम आदेशात विविध खासगी पक्षांना वॉट्सऍप किंवा इतर माध्यमांद्वारे अनधिकृतपणे असे करणाऱ्यांवर बंदी घातली आहे.

जी-इंटरटेन्मेंट इंटरप्राइजेसकडे चित्रपट प्रदर्शित करणाऱ्याचे विशेष अधिकार

Special rights of the film releasers to G-Entertainment Enterprises

सुनावणी दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले की, जी-इंटरटेन्मेंट इंटरप्राइजेसकडे चित्रपट प्रदर्शित करणाऱ्याचे विशेष अधिकार आहेत आणि ही बाब त्यांच्या दृष्टीने सर्वप्रथम आहे आणि जर हे थांबवले नाही तर त्यांना न भरून येणारे नुकसान होईल. खंडपीठाने वॉट्सऍपला सांगितले की, जेवढे शक्य होईल तेवढ्या लवकर असे खाते निलंबित करावे. जी-इंटरटेन्मेंट च्या याचिकेत म्हटले आहे की, त्यांच्याकडे चित्रपटाबाबतचे अन्य अधिकार आहेत आणि त्यांच्याकडे चित्रपट प्रदर्शित करण्याचा विशेष अधिकार आहे.

खंडपीठाने हे नोटीस केले की, खासगी व्यक्तींशी संबंधित वॉट्सऍप अकाउंट च्या प्रिंट आउसद्वारे असे लक्षात येते की ते चित्रपटाची विक्री करीत आहेत आणि मेसेजेसद्वारे असे समजते की याच्या बदल्यात ते पैसेही मिळवत आहेत. जी-इंटरटेन्मेंट ने खंडपीठाला सांगितले की, १४ मे रोजी फिर्यादीने महाराष्ट्र सायबर डिजिटल क्राईम युनिटकडे तक्रार दाखल केली होती आणि १७ मे रोजी सायबर सेलमध्ये एक एफआरआय देखील दाखल करण्यात आला आहे.

अभिनेता सलमान खान आणि दिशा पटानी यांचा चित्रपट ‘राधे यूअर मोस्ट वॉन्टेड भाई’ ओटीटी प्लॅटफॉर्म जी प्लेक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. प्रदर्शित झाल्यानंतर ‘पायरेसी’चा मुद्दा निर्माण झाला आहे. यापूर्वी सलमान खानने देखील ट्विट करून लोकांना चित्रपट पायरेटेड साइट्स वर न पाहण्याचे अवाहन केले होते आणि म्हटले होते की जर अजूनही असे केल्यास सायबर सेल त्या गुन्हेगारांविरूद्ध कठोर पावले उचलेल.
On the occasion of Eid, the Delhi High Court has given a big and important order regarding the release of Bollywood actor Salman Khan’s film ‘Radhe Your Most Wanted Bhai’.


अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला –

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर चोराचा प्राणघातक हल्ला

Social Media