सागर किनारे दिल ये पुकारे, ‘तू जो नहीं तो मेरा कोई नहीं’ ! बंडोबांची फडणवीसांना आर्त हाक!

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक(Maharashtra Assembly elections) २० नोव्हेंबरला तर मतमोजणी २३ नोव्हेंबरला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरूवात २१ ऑक्टोबरला म्हणजेच नियमीत प्रथा आणि नियमांपेक्षा दहा दिवस उशीराने झाली आहे. इतका उशीर होवूनही प्रमुख राजकीय पक्ष आणि नेते यांच्याकडून जागावाटप आणि उमेदवारी जाहीर करण्याच्या बाबतीत घाई केली जात नाही. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे सर्वच पक्षांना बंडोबांची भिती आहे. अगदी पार्टी विथ डिफरन्स म्हटल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा देखील आता याला अपवाद नाही.

Devendra-Fadnavis
तर त्याचे झाले असे की रविवारी भाजपच्या ९९ उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली. अर्थातच पक्षाकडून ‘आम्हीच नंबर वन’ आणि ‘सारे काही अलबेल’ असे सांगायची जी वर्षानुवर्षांपासून आहे ती परंपरा चालवत हे सारे थाटात झाले. पण सोमवारी सकाळपासूनच पक्षाचे सर्वात महत्वाचे नेते आणि महाराष्ट्र भाजपचे सर्वेसर्वा समजल्या जाणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या ‘सागर’ या शासकीय बंगल्यासमोर राज्यभरातील असंतुष्ट उमेदवार आणि इ्च्छूकांच्या ‘लाटा’ येवून धडकू लागल्या. या साऱ्यांच्या मनात स्वा. सावरकरांच्या मनात मार्सेलिस बंदरावर ज्या भावना होत्या तश्याच कासाविस करणाऱ्या भावना होत्या म्हणे. पण या ‘सागरा प्राण तळमळला’ म्हणणाऱ्यांचे कारण पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने हे होते!

वसंत-खंडेलवाल

तर गमतीचा भाग सोडा. पण पक्षाने ९९ मध्ये ७२ जागा जुन्याच विद्यमान आमदारांना दिल्यानंतरची ही स्थिती आहे हे लक्षात घ्यायला हवे ही भाजपची स्थिती आहे कॉंग्रेस नव्हे बरे! पुन्हा पक्षाने कल्याण पूर्व मध्ये नवऱ्याच्या जागी बायको (गणपत गायकवाड), वहिनीच्या जागी दिर (अश्विनी जगताप- शंकर जगताप) अशी आणखी पाच सहा किरकोळ बदलांची यादी यात प्रसारीत केली तर ७५च्या आसपास तेच ते आणि तेच ते उमेदवार पक्षाने दिले. नो रिस्क! पण तरीही या साऱ्या सुमारे चार डझन पेक्षा जास्त असंतुष्टानी आणि ज्या जागा अद्याप जाहिर व्हायच्या आहेत तेथील इच्छुकांनी मग फडणवीस यांच्या बंगल्यासमोर गर्दी केल्याचे चित्र दिसले. या गर्दीचा फडणवीस यांना एकच सूर होता म्हणे एका फिल्मी अंदाजमे रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकारांने हे वर्णन असे केले “सागर किनारे दिल ये पुकारे, तू जो नही तो मेरा कोई नही’ ! मग काय? फडणवीस यांना त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा गहिवर न येता तरच नवल. त्यांनी साऱ्यांच्या भेटी घेतल्या काय बदले मे हवे असे विचारपूस केली म्हणे! आणि काहींना आधे इधर जाव (अजित दादा) आधे ऊधर जाव (शिंदे गट) म्हणून काही सोय लागते का? याची चाचपणी केली.

Devendra-Fadnavis

मग त्यांनी बाकीच्यांना वंचित किंवा तिसरी आघाडी मे जाव असा सल्ला गुपचूप दिला म्हणे! पण थोडक्यात काय या बंडोबाच्या सुरवंटांना फुलपाखरू होण्याची आस आहे तर त्यांच्यासाठी मग व्यवस्था देखील यावेळी चांगलीच केली आहे. अर्थात आता यातील काही जणांचा बाल हट्ट काहींचा राज हट्ट कायमच आहे. मग त्यांच्यासाठी पाच जागा राज्यपाल नियुक्त ठेवल्याच आहेत ना? थांबा की थोडं आपलंच सरकार यावे यासाठी जोमाने काम करा! म्हणून सांगण्यात आले म्हणे! काही असो सागराच्या पोटात ही रत्न चांगलीच विसावली आणि आता नव्या यादीनंतर तर भाजपच्या नेत्यांनाही पक्के माहिती आहे की काहीच तरणोपाय नाही त्यामुळे २८ तारखेच्या मध्यरात्री पर्यंत हा सस्पेन्स सुरू राहू शकतो. २९ तारखेला शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा, त्यानंतरही ‘किंचीत राहिलेली फुणफुण’ समोर येण्याची शक्यता आहे बरे!

Devendra-Fadnavis

तर आता ज्यांच्यासाठी वंचित किंवा तिसऱ्या आघाडीचा उतारा लागू पडेल ते काय करतील? तर भाजपच्या आघाडीच्या घटकपक्षांसमोर किंवा पुढे जावून अपक्ष लढण्याची शक्यता आहे. म्हणजे या साऱ्या खटाटोपानंतरही यंदाच्या निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत जी यावेळी खूप जास्त आहे. बंडोबांचे थंडोबा करण्यासाठी पक्षाला ठेवणीतील फॉर्म्युला साम-दाम-दंड भेद निती वापरावी लागणार आहे. पाहूया घोडा मैदान जवळच आहे!

किशोर आपटे

(राजकीय विश्लेषक)

मंकी बात…

Social Media