“लाडकी बहीण” योजना बंद होणार नाही……?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मुंबई : राज्यातील लोककल्याणकारी योजनांचा अर्थव्यवस्थेवर ताण असला तरी कोणतीही योजना बंद केली जाणार नाही,अशी ठाम ग्वाही रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी सह्याद्री अतिथीगृहात घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना दिली. त्यांनी यावेळी हेही स्पष्ट केले की,”माझी लाडकी बहीण” योजना असो किंवा इतर कोणतीही कल्याणकारी योजना, राज्य सरकार त्यात कोणताही बदल करणार नाही. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सुरू झालेल्या कोणत्याही योजना थांबविल्या नाहीत किंवा त्यांच्या चौकशीचे आदेश दिलेले नाहीत, असेही त्यांनी यावेळी ठामपणे स्पष्ट केले.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होत असून त्याच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मात्र, विरोधी पक्षांनी नेहमीप्रमाणे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

“सध्या विरोधकांची अवस्था ‘हम आपके है कौन?’ चित्रपटासारखी झाली आहे. त्यांनी सक्षम विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहून काम करावे. आमच्याकडे प्रचंड बहुमत असले तरी विरोधी पक्षाचा सन्मान राखत काम करू,”असा महत्त्वपूर्ण सल्लाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना दिला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्यातील आर्थिक शिस्त योग्य प्रकारे पाळली जात आहे.त्यामुळे ‘माझी लाडकी बहीण’ यासह कोणतीही कल्याणकारी योजना बंद केली जाणार नाही.” कॅगच्या (CAG) सूचनांनुसार पात्र नसलेल्या लाभार्थ्यांना योजनेंतर्गत लाभ देता येणार नाही, इतकाच नियम सरकार पाळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एका प्रश्नाच्या उत्तरात बोलताना त्यांनी आवर्जून स्पष्ट केले की,”एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या कोणत्याही योजना मी थांबलेल्या नाहीत. त्यांच्या कामांची चौकशी सुरू झाल्याच्या अफवाही निराधार असून, आमच्यात कोणतेही कोल्डवॉर नाही, उलट वॉरच कोल्ड आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी शासनाच्या कोणत्याही पत्रावर चौकशी संदर्भात “तपास करा किंवा माहिती घ्या” असा शेरा असतो.याचा अर्थ तिथे चौकशी सुरू झाली असे होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अमित शहा-शिंदे भेटीवर खुलासा
संजय राऊत यांनी केलेल्या पहाटे चार वाजताच्या भेटीच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. “त्या भेटीवेळी मीही उपस्थित होतो. सकाळी दहा वाजता शिंदे साहेब अमित शहा यांना भेटले, तो केवळ सौजन्याचा भाग होता. कोणतीही खास चर्चा झाली नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

रक्षा खडसे प्रकरणावर कठोर भूमिका
रक्षा खडसे यांच्या मुलीच्या प्रकरणा संदर्भात विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, “कोणत्याही नेत्याने हस्तक्षेप केलेला नाहीही घटना दुर्दैवी असून असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.”तरं मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “धनंजय मुंडे यांच्याबाबत सरकारने आधीच भूमिका स्पष्ट केली आहे.माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे.न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर सरकार योग्य ती भूमिका घेईल.”असे स्पष्ट भूमिकाही यांनी मांडली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल मिश्किल शब्दांत मार्मिक बोलताना हलक्या फुलक्या शब्दांत, “महायुती सरकार आल्यापासून आमच्या खुर्च्या बदलल्या, पण अजितदादांची खुर्ची मात्र फिक्स आहे,” असा खास नागपुरी विनोदी टोला हाणला. त्याच दरम्यान हजरजबाबी असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तातडीने पुढे स्पष्ट केले, “आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो नसून, जनतेची कामे करण्यासाठी एकत्र आलो आहोत. सध्या उन्हाळा सुरू आहे, त्यामुळे कोल्डवॉर कसे असेल?

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *