धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेना फोन, तब्येतीची विचारपूस करत काळजी घेण्याचा दिला सल्ला

मुंबई  : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भगिनी व माजी मंत्री पंकजाताई मुंडे या आजारी असल्याचे समजताच त्यांना फोन करून तब्येतीची विचारपुस केली आहे. पंकजाताई मुंडे यांना ताप खोकला असून त्यांनी स्वतः ट्विट करून आयोसेलट झाल्याबाबतची माहिती दिली होती.

जून महिन्यात धनंजय मुंडे हे कोरोना विषाणूचा सामना करून, त्यावर मात करून परत आले. या आजारात होणार त्रास अनुभवला असून त्यादृष्टीने काळजी घेण्याचा सल्लाही धनंजय मुंडे यांनी पंकजाताईंना दिला असल्याचे समजते. पंकजा मुंडे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी मराठवाड्यात आल्या होत्या. प्रचारादरम्यान त्यांना सर्दी, खोकला व ताप आल्याने त्या मुंबईला परतल्या. त्या होम आयसोलाटेड आहेत.

पंकजा मुंडे यांनी कोरोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्याबाबतच्या सर्व चाचण्या करून घ्याव्यात, स्वतःची व कुटुंबियांची काळजी घ्या व लवकर बऱ्या व्हा असा सल्ला धनंजय मुंडे यांनी फोन वरून दिला आहे. तसेच पंकजा मुंडे यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

tag-pankajamunde/dhananjaymunde

Social Media