वजनावर नियंत्रण ठेवा(Control your weight)
शरीरात चरबी अधिक असेल, विशेषत: पोटाच्या भागात चरबी साठून राहिली असेल तर इन्सुलिन तयार करण्यास शरीराकडून होणारा प्रतिकार वाढू शकतो. यामुळे टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता असते.
नियमित व्यायाम करा(Exercise regularly)
दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा. दररोज साधारण प्रकारची शारीरिक हालचाल केल्यास वजन नियंत्रणात राहते. रक्तशर्करेचे प्रमाण कमी होते आणि रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलमध्येही सुधारणा होते.
समतोल, सकस आहार घ्यावा(Eat a balanced, healthy diet)
तुमच्या आहारातील चरबीयुक्त पदार्थ कमी करावेत. विशेषत: सॅच्युरेटेड आणि ट्रान्सफॅट्स टाळावेत. फळं, भाज्या आणि तंतुमय पदार्थ असलेला आहार घ्यावा. आहारातील मीठ कमी करावं. प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये मीठ, चरबी आणि कॅलरीज अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे ताजे घटक वापरून घरी तयार केलेल पदार्थ खाण्यावर भर असावा.