दीक्षाभूमी स्तूप दर्शन खुले

नागपूर : करोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करून धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली असताना मोठ्या गर्दीचे कार्यक्रम टाळण्याच्या हेतूने नागपूरच्या दीक्षाभूमीवरील 65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. परंतु लोकाग्रहास्तव दीक्षाभूमी स्तुपातील दर्शन चालू राहणार आहे परमपूज्य डॉ.बाबा साहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर सुधीर फुलझेले यांनी बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन 14 किंवा 15 ऑक्‍टोबरला घेण्याऐवजी गर्दी टाळण्याच्या हेतूने त्याआधी किंवा नंतर दीक्षाभूमीवर येऊन करावे अशी विनंती अनुयायांना केली आहे.

दीक्षाभूमीवर आरोग्य विभागाचे तसेच स्मारक समितीचे अधिकारी अनुयायांना त्यांचे ओळखपत्र किंवा करोना लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दाखवण्यास सांगू शकतात तसेच आजारी व्यक्ती, गरोदर महिलांनी येथे प्रवेश करू नये असे सुद्धा फुलझेले यांनी नागपुरात पत्रपरिषदेत माहिती देताना सांगितले. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता पंचशील ध्वजारोहण , निवडक भिक्खू संघ आणि स्मारक समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार असून विजयादशमी दिनी 15 ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजता स्मारक समितीचे अध्यक्ष भन्ते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या उपस्थितीत आणि स्मारक समितीच्या पदाधिकारी बुद्धवंदना घेऊन मुख्य कार्यक्रम करतील.

या कार्यक्रमाचे थेट प्रसारण हे स्थानिक वाहिन्यांवर दाखवण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा फुलझेले यांनी यावेळी दिली. दरम्यान दीक्षाभूमीसंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दीक्षाभूमीवर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जाईल. दोन डोस न घेतलेल्या नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे व्यापक आरोग्य हित लक्षात घेऊन भाविकांनी यावर्षी दीक्षाभूमीवरील गर्दी टाळावी, असे आवाहन केले आहे.


किलिमिंजारोची सैर करणाऱ्या मध्य भारतातील पहिल्या महिला मेडिको… –

किलिमिंजारोची सैर करणाऱ्या मध्य भारतातील पहिल्या महिला मेडिको…

Social Media