गेले दोन दिवसांपासुन गाजत असलेले दिनानाथ मंगेशकर हाॅस्पिटल प्रकरणामुळे पुन्हा पुन्हा मी ईतीहासामधे जात आहे ..
पुन्हा ईतिहासामधे जाऊन “पूर्वी घेतला गेलेला चुकीचा निर्णय पुन्हा सुधारता येऊ शकला असता तर?” हा विचार त्रास देतोय!!!
दिनानाथ मंगेशकर हाॅस्पिटलच्या जागेसोबत आमच्या लहानपणच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत , एक भावनीक नातं आहे त्या जागेसोबत माझ्या घरच्या सर्वांचच.
ती 6 एकर जागा आणी त्याच्या बाजूच्या हिमाली आणी संकुल सोसायटी हा पूर्णं पट्टा आमची ( खिलारे कुटुंबाची) शेती होती. आमचे काका श्री.अमृतराव व कै.काशिश्वर खिलारे हे तीथे शेती करत होते त्यांनीही या प्रस्तावास लगेच मान्यता दिली.
हिमाली आणी संकुल बांधकाम चालू होणार होत, मधला 6 एकर पट्टा मोकळाच होता.
मा.शरद पवार, मा.विलासराव देशमुख हे
माझे वडिल पुण्याचे माजी महापौर दि.ज.खिलारे यांचे मित्र होते. त्यांचे नेहमीच घरी येण जाण होत.
लता मंगेशकर या पुणे शहरामधे हाॅस्पीटलसाठी जागा शोधत होत्या. तशी ईच्छा त्यांनी शरदरावांना बोलून दाखवली.
या सर्व गोष्टींची मी आणी सर्वं खिलारे परिवार साक्षीदार आहोत – शरद पवार यांचा भाऊंना फोन आला की खिलारेसाहेब कर्वॅरोड डेक्कन काॅर्नर ते पौडफाट्याच्या पुढेपर्यंत सर्वं तुमच्या मालकीच्या जागा आहेत. गरवारे काॅलेज, नळस्टाॅपचं चर्च, महिलाश्रमच्या जवळपास 15 एकर जागा तुमच्या वडिलांनी (जयसिंगराव खिलारे) यांनी विनामोबदला दिली आहे- लतादिदी धर्मादाय हाॅस्पिटलसाठी जागेच्या शोधात आहेत, एरंडवण्यामधे तुमची शेती आहे त्यातला 6 एकर जागेचा पट्टा दिदींना धर्मादाय हाॅस्पीटलसाठी द्यावा.
शरद पवारांनी ही विनंती करतानाच जाता जाता एक गोष्ट कानावर घातली जी हसत हसत धमकी होती की खिलारेसाहेब कर्वॅरोडच्या अर्ध्या जमिनींचे मालक तुम्ही आहात पण सिलींगचा कायदा आलेला आहे जमिनी सिलींगमधे जातील त्यापेक्षा धर्मादाय हाॅस्पीटलसाठी ती
जागा द्यावी. ही विनंती वजा धमकी होती.
गरवारे काॅलेज(Garware College), महिलाश्रम,चर्च अशा कितीतरी जागा सिलींगचा कायदा नसताना आमच्या खिलारे परिवाराने दान केल्या होत्या हे पवारसाहेब विसरले होते…. मंगेशकरची जागा तर फक्त 6 एकर होती.
माझ्या आत्याचे आणी मोठ्या बहिणीचे सासरे मा.आमदार नामदेवराव मते, माझ्या लहान बहिणीचे सासरे मा.खाजदार विठ्ठलराव तुपे यांनी पुन्हा पुन्हा सांगीतल की भाऊसाहेब तुम्ही खिलारे कुटुंबाने स्वतः तीथे काॅलेज किंवा हाॅस्पिटल बांधा..
पण आमच्या खिलारे कुटुंबातील सर्वांनी आज्जी आजोबा, काका, आई, काकू, आत्या, आम्ही बहिण भावांसोबत ती जागा द्यावी की नाही याबद्दल चर्चा होऊन सर्व संमतीने ही जागा विनामोबदला देण्याचे ठरले होते आणी तसा शब्द शरदरावांना दिला गेला होता. त्यामुळे रोज कोणाचे ना कोणाचे घरी फोन यायचे एवढी मोठी सोन्यासारखी जागा नका देऊ मंगेशकरांना . धर्मादायी हाॅस्पिटलच्या नावाने आज तुम्ही जागा द्याल पण भविष्यात तीथे पैशांचा कारखाना सुरू होईल आणी तीच भविष्यवाणी नंतर वेळोवेळी अनुभवात आली..
खिलारे यांचे नाव हाॅस्पीटलला द्यावे किंवा एक पूर्णं मजला तुमच्या कुटुंबासाठी नेहमी रिझर्वं ठेवावा असही बरेच जणांनी सुचवल होत. पण दिनानाथ मंगेशकर हाॅस्पीटलच्या सुरवाती पासुन शेवटपर्यंतच्या 6 एकर परीसरातील अगदी एखाद्या फरशीवरही आम्ही खिलारेंच नाव लावून घेतल नाही परंतू गोर गरीब पेशंटला ट्रिटमेंटवर 30 % सुट देण्यात यावी ही ईच्छा आम्ही बोलून दाखवली होती.
आणी याच गोष्टीमुळे मनापासुन वाईट वाटत जेव्हा या वास्तूमधे पुन्हा पुन्हा पैशांसाठी उपचारांअभावी रूग्णांचे बळी जातात आणी ईथे रूग्णांकडून अवाच्यासवा दर आकारले जातात.
ह्रद्यनाथ, लतादिदी,आशादिदी, शरदकाका सर्वंजणांशी आमचे मैत्रीचे संमंध आहेत,या जागेची बोलणी चालू असताना हे सर्वंजण आमच्या घरी येत असत आणी तासनतास चर्चा चालत असे..
माझी बहिण वर्षा तुपे हिच्या लग्नामधे 30 एप्रील 1989 मधे जवळपास 20 हजार लोकांच्या साक्षीने कलश स्वरूपात ही जागा मंगेशकर कुटुंबियांना दिली गेली होती.
हाॅस्पीटल बांधल गेल आणी काही वर्षातच हाॅस्पीटल मॅनेजमेंट ज्ञानपिरबोधनीचे डाॅ.केळकर यांच्या हातात गेल…
या जागेचे मूळ मालक खिलारे कुटुंबातील माजी महापौर खिलारे यांची बायपास सर्ज्ररीसाठी लाखो रूपये बील आकारल गेल तेही आम्ही समजू शकतो की जो तो त्याच्या स्वभावानुसार वागतो परंतू बीलामधे डाॅ धनंजय केळकरांनी स्वतःचे व्हीजीट चार्जेस 600रू.लावले होते जेव्हा की ती पेशंट व्हीजीट नव्हती तर ज्या माणसाने कोट्यावधींची जागा तुम्हाला दान केली त्या माणसाला भेटायला ते आले होते.
“मूळ मालक आम्ही आहोत बील देणार नाही किंवा बिल कमी करा” ही दादागीरी , माज किंवा क्षृद्रपणा खिलारे कुटुंबाने दाखवला नाही. धनंजय केळकरांनी लावलेल स्वतःचे 600रू व्हिजीट चार्जेस यालाही आम्ही हसण्यावारी नेल..
त्या प्रत्येक घटनेचे आम्ही खिलारे परीवारातील सदस्य साक्षीदार आहोत आणी आता याची खंत वाटते की विना मोबदला दिल्या गेलेल्या जागेचा वापर पैसा कमविण्यासाठी केला जात असताना जेव्हा ईथे कोणाचा नाहक बळी जातो – हे मात्र आम्ही हसण्यावारी नेऊ शकत नाही..
दिनानाथ मंगेशकर हाॅस्पीटलमधे धर्मादायाच्या नावाखाली चाललेली लुबाडणूक आणी पैशांअभावी पेशंटच्या म्रुत्यूस कारणीभुत ठरलेल्या मंगेशकर हाॅस्पीटल प्रशासनाचा आम्ही मूळ मालक खिलारे परिवार नीषेध करत आहोत घडलेल्या घटनेचे आम्हाला दुःख आहे.
Our childhood memories are deeply connected to the land where the Dinanath Mangeshkar Hospital now stands—it holds an emotional bond for everyone in our family.
This six-acre plot, along with the adjacent Himali and Sankul societies, was originally the farmland of our family, the Khilare family. Our uncles, Shri Amritrao and the late Kashishwar Khilare, cultivated this land, and they readily approved the proposal for its new purpose.
When construction for Himali and Sankul societies began, the six-acre stretch in between remained vacant.
Prominent leaders like Sharad Pawar and Vilasrao Deshmukh were close friends of my father, D. J. Khilare, who was the former Mayor of Pune.
डाॅ. नयना सोनवणे-खिलारे 8007001111