नाशिक, दि 3 : दाट धुके, गुलाबी थंडी यामुळे आज 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला एक तास उशिराने सुरुवात झाली.
भारतीय पारंपारिक वेशभूषा धारण करून अबालवृद्ध या ग्रंथदिंडीत स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. लेझीमच्या, मल्लखांब यांच्या कलाकृतीने रसिकांची मने जिंकली, या ग्रंथदिंडीत नाशिक जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
या ग्रंथदिंडीचे स्वागत करण्यासाठी नाशिकचे पालकमंत्री आणि साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, माजी खासदार समीर भुजबळ, हेमंत टकले, संमेलनाचे कार्यवाह शंकर बोराडे, संजय करंजकर, सुभाष पाटील, लोकहीतवादीचे विश्वस्त दिलीप साळवेकर, विधान परिषदेचे सभापती नरहरी झिरवाळ, कृषी मंत्री दादा भुसे, पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्यासह साहित्यप्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.