दिशा सालियन प्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांकडून जुनेच आरोप! आदित्य ठाकरेंचे प्रत्त्युत्तर !

मुंबई  :  दिवंगत अभिनेता सुशांत सिंग(Sushant Singh)ची मँनेजर दिशा सालियन(Disha Salian)च्या वडिलांनी मुंबई उच्चन्यायालयात( Bombay High Court) याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाच वर्षानंतर हे प्रकरण  चर्चेत आहे. या याचिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंवर भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन  गंभीर आरोप केले. त्यानंतर आता आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांनी देखील नारायण  राणे(Narayan Rane) यांच्या आरोपांना  जोरदार प्रत्त्युत्तर दिले  आहे.

‘माझं तेच काम आहे, यांना उत्तर द्यायचं नाही, कारण यांना पगारच इतरांवर घाण आरोप करायचा मिळतो. आपण आधी पाहिलं असेल माझ्या परिवारावर असेल माझ्या वडिलांवर असेल, माझ्या पक्षावर असेल, त्यांनी आरोप केले.  त्यांना पक्ष सोडून किती वर्ष झाली मात्र त्यांच्या मनातून आम्ही काय उतरत नाही. बोलू द्या त्यांना. पक्ष सोडल्यापासून ते आमच्यावर टीका करतात. पण कचऱ्यावर आपण लक्ष देत नाही, असा टोला आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांनी लगावला आहे.

दरम्यान ते म्हणाले की,  आज  मी मुखमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे, हे पत्र खूप महत्त्वाचं आहे. रस्त्यांच्या कामात झालेल्या घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी मुंबईतील सगळ्याच आमदारांची आहे. 15 जानेवारी 2023 ला पत्रकार परिषद घेऊन मी ज्या घोटाळ्याला समोर आणलं होतं, त्याच्याची चर्चा आता सुरू आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान  त्यापूर्वीच  भाजप प्रदेश कार्यालयात  नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी सालियन.  प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा आपल्याला दोनदा फोन आल्याचा  दावा केला आहे. सतीश सालियन यांच्यावर दबाव होता. घरी महापौर पेडणेकर ताई जायच्या. आणि इतर लोक जायचे. आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो नाही. ते दु;खात होते. त्यावेळी त्यांना पोलीस मदत करत नव्हते. आरोग्य विभाग मदत करत नव्हता असा आरोपही यावेळी राणे यांनी केला.”

The father of late actor Sushant Singh Rajput’s manager, Disha Salian, has filed a petition in the Bombay High Court. As a result, this case has once again come into the spotlight after five years. In this petition, BJP leader Narayan Rane made serious allegations against Shiv Sena (Thackeray faction) leader Aaditya Thackeray during a press conference. Following this, Aaditya Thackeray has now strongly rebutted Narayan Rane’s allegations.


 

Social Media