अर्थव्यवस्थेवर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव कमी तर, निर्गुंतवणुकीचे उद्दीष्ट रूळावर : सीईए

नवी दिल्ली : मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी सांगितले आहे की, जीवन विमा कॉर्पोरेशन लिमिटेड (LIC) लाइफ इन्श्योरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (BPCL)सह इतर कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीचे उद्दीष्ट रूळावर आहे. त्यांनी सांगितले की, हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी जमीनी कार्य केले जात आहे. सरकारने निर्गुंतवणुकीद्वारे चालू आर्थिक वर्षांत १.७५ लाख कोटी रूपये जमा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ति सुब्रमण्यम यांनी कोरोना संसर्गाबाबत असे म्हटले आहे की, दुसऱ्या लाटेचा परिणाम पूर्वीपेक्षा कमी आहे. फेडरेशन ऑफ तेलंगणा चेंबर्स ऑफ कॉमर्स एँड इंडस्ट्री द्वारा आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, ‘मागील सलग आठ महिन्यांपासून जीएसटी संकलन एक लाख कोटींपेक्षा अधिक आहे, ज्याद्वारे असे लक्षात येते की खप वाढत आहे आणि यावर्षी अनेक गोष्टींवर काम सुरू आहे.’

आरबीआयने ‘या’ तीन सहकारी बँकांवर ठोठावला २३ लाखांचा दंड! – 

यापूर्वी सुब्रमण्यम यांनी त्यांच्या भाषणात म्हटले होते की, ‘सरकारद्वारे विनामुल्य योजनांवर खर्च केलेल्या प्रत्येक रूपयांवर अर्थव्यवस्थेला केवळ ९८ पैसे मिळतात. परंतु भांडवल खर्चाच्या प्रत्येक रूपयाद्वारे अर्थव्यवस्थेला ४.५० रूपयांचे योगदान मिळते. ’मुख्य आर्थिक सल्लागारांनी सांगितले की, १.७५ लाख कोटी रूपयांचा एक मोठा निधी एलआयसी च्या इनिशियल पब्लिक ऑफरद्वारे (IPO) प्राप्त होईल. याशिवाय भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.चे खासगीकरण होणार आहे. या दोन्ही गोष्टींमुळे निर्गुंतवणुकीच्या लक्ष्याचा एक महत्वाचा भाग पूर्ण होईल.

बँकांच्या ग्राहकांसाठी आरबीआयची मोठी घोषणा…. – 

विशेष म्हणजे केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि वित्तीय संस्थांमध्ये भागभांडवल विक्रीद्वारे १.७५ लाख कोटी रूपये उभे करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. यामध्ये दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह एका विमा कंपनीच्या निर्गुंतवणुकीचा समावेश आहे. सीईए यांनी सांगितले की, ‘हा वर्ष खासगीकरणासाठी ओळखला जाईल. सध्या आमच्याकडे ९ महिने शिल्लक आहेत. मला खात्री आहे की आम्ही १.७५ लाख कोटी रूपयांचे उद्दीष्ट साध्य करू. ’
Second wave of Corona has less impact on economy, Disinvestment target on track: CEA.


‘या’ बँकांचे खासगीकरण होण्याची शक्यता! –

…लवकरच सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ बँकांचे खासगीकरण होण्याची शक्यता!

रेटिंग संस्था S&P ने कमी केला विकास दराशी संबंधित अंदाज! –

मूडीजनंतर आता रेटिंग संस्था S&P ने कमी केला विकास दराशी संबंधित अंदाज!

Social Media