नेतृत्वाची जबाबदारी घेण्यास महिला सक्षम : जिल्हाधिकारी आर विमला

नागपूर : आर विमला जिल्हाधिकारी नागपूर यांनी  जागतिक महिला दिनाच्या  शुभेच्छा देत म्हणाल्या की, पुरुष व महिला कर्मचाऱ्यांचा  भेद करू नये सेवाविषय सर्व बाबतीत पक्षपात करू नये महिलांना पुरुषाप्रमाणे समान दर्जा मिळत असल्यामुळे आजचा कार्यक्रम पुरुषाच्या सहकार्याने यशस्वी झाला आहे. हे विसरून चालणार नाही विकास करण्यासाठी समाजाला पुरुष व महिला दोघांचीही गरज आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे नेतृत्वाची जबाबदारी घेण्यासाठी त्या पुढे येत आहेत असे महिलादिनी  त्या म्हणाल्या.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना तसेच जिल्हा परिषद महिला कर्मचारी यांचा 8मार्च जागतिक महिला दिवसाचा कार्यक्रम बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नागपूर येथील सभागृहात पार पडला.  या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आर विमला जिल्हाधिकारी नागपूर यांच्याहस्ते सावित्रीबाई फुले आणि सुजाता गंधे यांनी माँ जिजाऊच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

प्रमुख पाहुणे मा.सुजाता गंधे निवासी उपजिल्हाधिकारी नागपूर  एडवोकेट रश्मी खापर्डे माननीय अशोक दगडे अध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र तसेच अशोक थुल सरचिटणीस महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ कार्यक्रमाचे अध्यक्ष  मंगलाताई जाळेकर या उपस्थित होत्या.

 

 

यावेळी महिलांसाठी खेळाचे आयोजन करण्यात आले होते. खेळीमेळीच्या वातावरणात जिंकणाऱ्या प्रत्येक महिलेला बक्षिस देण्यात आले. दरम्यान काही महिलांनी गाणी  गायली तर काहींनी कविता सादर केल्या.

Covid-19 या साथीच्या आजारात  शासकीय सेवा प्रभावीपणे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय व जनसेवेच्या गौरवार्थ कार्य केल्याबाबत  आर विमला जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शॉल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सुनंदा महंत, नीलिमा झांबरे, भावना सूर्यवंशी, कादम्बिनी तिरपुडे, कविता बोंद, आशा पाटील या शासकीय महिला कर्माचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला..विधी सल्लागार  अशोक दगडे अध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र,  अशोक थुल सरचिटणीस  म.रा. जि.प.क. महासंघ महाराष्ट्र संगीता गायकवाड महिला समिती सदस्य अखिल भारतीय, हर्षना रोटकर पत्रकार यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन पर भाषणे केलीत.

यावेळी नागपूर शहरातील विविध कार्यालयातील शासकीय महिला अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला दिनाच्या अनुषंगाने चर्चा साठी मसुदा मागण्याचा ठराव पारित करण्यात आला.   मेघा करारे , नीलिमा राठोड, वैशाली कडू, शुभांगी जुंदरे, निकिता चव्हाण, रंजना चौरागडे, पिट्टलवार, सविता उके, मानसी कट्यारमल, प्रियंका नाकतोडे, संगीता, दीपाली कठाणे, हितुषा नागपुरे, नीता डडमल, जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर महल्ले, संघाचे अध्यक्ष गोपीचंद  कातुरे कार्याध्यक्ष नारायण समर्थ, वाकोडीकर केशव, नाना कडबे यशवंत कडू प्रल्हाद शेंडे सहसचिव मनीष किरपाल राजेंद्र ठाकरे प्रशांत शास्त्री दीपक गोतमारे महसूल संघटनेचे देवेंद्र शिरोडकर,  राजेंद्र ढोमणे इत्यादींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा करारे यांनी केले, प्रास्ताविक पद्मा सलामे  यांनी केले तर आभार प्रदर्शन आशा पाटील यांनी केले.

Social Media