Beauty Tips : चेहऱ्यावरील मृतपेशी नष्ट करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय!

मुंबई : चेहऱ्याचे सौंदर्य मृत पेशींमुळे खराब होते. चेहऱ्यावर मृत पेशी जमा झाल्याने त्वचा अस्वस्थ आणि निर्जीव होते. यापासून बचाव करण्यासाठी चेहऱ्याला वेळोवेळी एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे. याचा फायदा असा होतो की चेहऱ्याच्या त्वचेचा वरील थर स्वच्छ होतो आणि रक्त परिसंचरण चांगले होते. एक्सफोलिएट तुम्ही घरीच करू शकता. हे बनविण्यासाठी तुम्ही घरगुती वस्तूंचा वापर करू शकता. यामध्ये साखर आणि मध, ओटमील स्क्रब, बेकिंग सोडा, कॉफीसह इतर वस्तूंचा वापर केला जाऊ शकतो.

Dead skin gets removed with sugar and honey

beauty-tips

साखर आणि मध चेहऱ्यासाठी खूप चांगले असल्याचे मानले जाते. साखर स्क्रबचे काम करते, तर मधामुळे त्वचा मऊ बनते. ही पेस्ट तयार करण्यासाठी एक चमचा मध आणि एक चमचा साखर एकत्र मिसळा. त्यानंतर ही पेस्ट चेहरा आणि मानेला लावून काही काळ तसेच ठेवा. यामुळे मृत पेशी नष्ट होतात. याचा आठवड्यातून एकवेळा वापर करू शकता.

oatmeal scrub benefits

beauty-tips

ओटमील स्क्रब देखील खूप फायदेशीर आहे. चेहऱ्याच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी दोन चमचे ओटमीलची पावडर घ्या त्यामध्ये पाणी मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा. पाच मिनिटांनी चेहऱ्याला थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

beauty-tips : त्वचा आणि केसांसाठी बीटाच्या मास्कचे फायदे – 

Facial stains removed with baking soda

beauty-tips

बेकिंग सोडा चेहऱ्यावरील डाग दूर करतो. चेहऱ्यासाठी बेकिंग सोडा खूप फायदेशीर आहे. यासोबत व्हिटॅमिन-ई कॅप्सूल मिसळल्यास याचा फायदा आणखी वाढविला जाऊ शकतो. तज्ञांच्या मते, एक चमचा बेकिंग सोड्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे तेल मिसळा. ही कॅप्सूल मेडिकलमध्ये उपलब्ध असते. या दोन्ही वस्तू पाण्यात घालून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्याला लावा.

Beauty Tips : अंड्याच्या मदतीने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स होतात दूर…. – 

Coffee also gives relief

beauty-tips

चेहऱ्यासाठी कॉफी देखील फायदेशीर आहे. कॉफीच्या मदतीने चेहऱ्याला एक्सफोलिएट केले जाऊ शकते. दोन ते तीन चमचे कॉफीची पावडर घ्या आणि त्यामध्ये एक चमचा नारळाचे तेल मिसळा. यासोबतच थोडेसे पाणी मिसळा. ही पेस्ट तयार करून चेहऱ्यावर घासा त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
Dead Cells spoils the appearance of the face, take these measures to avoid.


Beauty Tips : त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी करा ‘हे’ तीन घरगुती उपाय…. –

Beauty Tips : चेहऱ्याला सुंदर बनविण्यासाठी ‘या’ तीन घरगुती वस्तूंचा करा वापर, मुरूमे डागांची समस्या होईल दूर….

Social Media