स्थिती सुधारत असताना गाफिल राहू नका तिसरी लाट येवू शकते : मुख्यमंत्र्यांचा जागते रहोचा इशारा!

मुंबई  : राज्यात कोरोनाची स्थिती सुधारत असताना गाफिल राहू नका तिसरी लाट येवू शकते असा इशारा केंद्रीय तज्ज्ञ देत आहेत त्यामुळे आणखी काही दिवस काळजी घ्यावी लागेल अश्या  शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी कोरोनाच्या लढ्यात जनतेला जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे.

 

फेसबूक लाईव्हच्या माध्यमांतून जनतेशी संवाद(Interaction with the public through Facebook Live)

फेसबूक लाईव्हच्या माध्यमांतून जनतेशी संवाद साधताना त्यांनी लोकांना गेल्या काही दिवसांपासून करत असलेल्या सहकार्यासाठी धन्यवाद दिले ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयानेही या मुंबई पँटर्न चे कौतुक केले आहे, हे सारे तुमच्यामुळे शक्य झाले आहे. मात्र त्यामुळे आपली जबाबदारी आणखी वाढली आहे असे ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की कोरोनाची तिसरी लाट येवू शकते या इशाऱ्यानुसार प्राणवायू औषधांपासून आरोग्य सेवांपर्यंत सर्वाची सज्जता केली जात आहे गेल्या काही दिवसांपासून आपण जशी काळजी घेत आहोत तशी घेत राहीलो तर ही लाट परतावून लावण्याचा चंग आपण बांधला आहे तो यश स्वी होणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की ही लढाई जारी आहे आणि आपल्याला जागरूक राहून सहकार्य करत राहावे लागणार आहे. या पूर्वी सारखेच ते  आपण देत राहा सरकारकडून लसीकरणाबाबत पावले टाकली जात असून लवकरच त्यात यश मिळेल असेही ते म्हणाले.

Chief Minister Uddhav Thackeray has urged the people to be aware of the corona fight saying that the third wave may not be there while the corona situation in the state is improving.

Social Media