Dr. Nagraj Manjule : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना डॉक्टरेट पदवी प्रदान !

मुंबई :  लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता नागराज मंजुळे यांच्या नावापुढे आता डॉक्टर ही उपाधी लागणार. मंजुळे यांना डी.वाय.पाटील विद्यापीठाने गौरविले आहे. चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल मंजुळे यांना डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. पिस्तुल्या, फॅन्ड्री, सैराट आणि आता झुंड यासह अनेक उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती करून मंजुळे यांनी नाव कमावले आहे. लेखन आणि दिग्दर्शनासोबतच त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये कामही केले आहे. त्यांच्या योगदानामुळे त्यांना डी.वाय.पाटील विद्यापीठातून डी.लिट.(D.Litt) बहाल करण्यात आली.

नागराज मंजुळे यांचा झुंड हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. नव्या कलाकारांना घेऊन केलेल्या या कलेचे दिग्गज कलाकारांनी कौतुक केले आहे. मंजुळे यांनी यापूर्वी फॅन्ड्री, सैराट या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.

यामध्ये सैराटने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. 100 कोटींचा टप्पा पार करणारा हा मराठी चित्रपटाच्या इतिहासातील पहिला चित्रपट ठरला. त्याआधी फॅन्ड्री सिनेमाची बरीच चर्चा झाली होती. पिस्तुल्या या लघुपटाला फॅन्ड्री चित्रपटासह राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

मंजुळे यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. फॅन्ड्री, सैराट या छोट्या भूमिकांसह नाळ चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना डीवाय पाटील विद्यापीठाने मानद डॉक्टरेट प्रदान केली  आहे.

नागराज मंजुळे यांचे मित्र प्रा. हनुमंत लोखंडे यांनी सर्वप्रथम ही बातमी चाहत्यांसाठी शेअर केली. डॉक्टरेट पदवी स्वीकारतानाचा फोटो शेअर करताना ते म्हणाले की, अंधारतल्या दिवसात तुम्हाला एम.फिल किंवा सेट/नेट हवे होते. यासाठी मला माझे पुणे विद्यापीठात जाण्याचे दिवस आठवतात. तुमचा 10वी इयत्तेपासून ते डी.लिटपर्यंतचा हा एक अविश्वसनीय स्वप्नवत प्रवास आहे.

चित्रपटांसाठी अनेक प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झाल्यानंतर, त्यांना डीवाय पाटील विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लेटर्स (डी. लिट.) ही मानद पदवी प्रदान करण्यात येत आहे. हे पाहणे हा माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे,” असे लोखंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. ,


Jhund : ‘झुंड’ चित्रपटासाठी बिग बींनी का घेतले कमी मानधन 

Kashmir Files :200 कोटींचा टप्पा पार; ‘द काश्मीर फाइल्स’ने रचला इतिहास !

OTT वर सर्वाधिक पाहिला जाणारा शो मध्ये कंगनाचा ‘लॉकअप नंबर वन’

Social Media