मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे(Dr. Neelam Gorhe) यांच्यावर ही विधान परिषद पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे, अशा आशयाचा विश्वासदर्शक प्रस्ताव भाजपा गटनेते आ.प्रविण दरेकर यांनी आज विधान परिषदेत मांडला. हा प्रस्ताव सभागृहाने आवाजी मतदानाने मंजूर केला.
आ.दरेकर यांनी “महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यावर ही विधानपरिषद पूर्ण विश्वास व्यक्त करत आहे”, असा एका ओळीचा प्रस्ताव सभागृहात मांडला. विधान परिषदेचे सभापती यांनी हा प्रस्ताव मतास टाकला व सभागृहाने आवाजी मतदानाने तो मंजूर केल्यानंतर प्रस्ताव मंजूर झाल्याचे सभापती यांनी जाहीर केले.
मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारत अधोगतीच्या वाटेवर : अतुल लोंढे