आपण सगळे जण मातीवर प्रेम करतो. मातीतून आपल्याला अन्न मिळतं. मातीपासून वेगवेगळ्या वस्तु तयार करतो. पण मातीतून नशाही येते असं म्हटलं तर? हो, हे खरं आहे. अलीकडे काही महिला, लहान मुलांना, तरुणवर्ग व वृद्धांना माती(earth) खाण्याचं व्यसन लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. आज-काल नागरिक या मातीचं व्यसन करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. आज काल खाण्यासाठी मातीची मोठ्या प्रमाणात विक्रीही होत आहे. आर्श्चर्य म्हणजे ही माती चक्क दुकाणात मिळत आहे.
वैद्यकीय दृष्ट्या माती अधिक व दीर्घकाळ सेवनाचे दुष्परिणाम
मातीमध्ये कॅल्शियमची(calcium) मात्रा अधिक म्हणजे 21.25 टक्के आहे. सामान्यतः मानवी शरीरात कॅल्शियमचं प्रमाण 8.5 ते 10.2 मायक्रो ग्रॅम / पार्ट असते. ही माती प्रमाणापेक्षा अधिक सेवनाने व दीर्घकाळ सेवनाने शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. अर्थात सेवन करणाऱ्याच्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण प्रचंड वाढल्याने त्याचा किडनीवर(Kidney) दुष्परिणाम होऊन किडनीची(Kidney) कार्यक्षमता कमी होते. शिवाय तहान खूप लागते व परत परत लघवीला जावं लागतं. तसेच भुकेवर परिणाम होऊन पचनसंस्था बिघडते.
अधिक कॅल्शियममुळे शरीरातील हाडांवर देखील परिणाम होऊ शकतो. कॅल्शियमचं प्रमाण वाढल्याने मेंदूवर परिणाम होऊन अनेकदा चक्कर येणे, थकवा जाणवणे, डिप्रेशन(Depression) येणे तर हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन हृदयगती कमी जास्त होणे, हृदय गतीवरील नियंत्रण सुटणे असे धोकादायक प्रकार होऊ शकतात. एकंदरीतच कॅल्शियम(calcium) अतिप्रमाणात सेवन करणे शरीराला हानिकारक ठरू शकतं.