पालिकेलाही कोरोनाचा फटका, करणार सेवाशुल्कात  वाढ !

मुंबई : 2020 या वर्षात कोरोना(Corona) महामारी आणि आर्थिक मंदीचा(economic downturn) फटका पालिकेच्या उत्पन्नाला बसला असल्याने पालिका सेवाशुल्कात वाढ करणार असल्याचे आयुक्त इक्बाल चहल यांनी स्पष्ट केले आहे.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे मुंबई महापालिकेला सर्वात जास्त मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात कोरोनाला रोखण्यात जास्त लक्ष द्यावे लागले. त्यामुळे विकास कामांवर काहीसा परिणाम झाला आहे. मात्र कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव कमी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. मात्र विविध उपाययोजना केल्याने सध्या कोरोनाला रोखण्यात यश आल्याचा दावा आयुक्त चहल यांनी केला आहे.

मुंबई शहराला २०३० पर्यंत ‘आनंदी व विकसित शहर’ बनविणे, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि विकासकामे देण्याचे उद्दिष्ट आणि कोरोनाचे संकट, त्यावरील खर्च, उत्पन्नावरील परिणाम आदी बाबी डोळ्यासमोर ठेऊन यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचे पालिका आयुक्त चहल यांनी म्हटले आहे. मालमत्ता कराची थकबाकी १५ हजार कोटींपेक्षाही जास्त झाली आहे. तर विकास शुल्क वसुलीतही घट आली आहे. त्यामुळे पालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आयुक्तांनी, उत्पन्न वाढीसाठी नवीन स्त्रोत निर्माण करणे, पालिकेकडून देण्यात येणाऱ्या सेवासाठी करण्यात येणाऱ्या शुल्कात काही वाढ करणे, शासनाकडील ५ हजार कोटी रुपयांची थकबाकी वसुली करणे, मालमत्ता कर वसुली करणे आदी उपाययोजनांद्वारे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणारअसल्याचे पालिका आयुक्तांनी सूतोवाच केले आहे.

Tag-Corona hit the municipality too/Will increase service charges/The blow of the economic downturn

Social Media