राजुरा, कोरपणा, जिवती व गोंडपिपरी तालुक्यात आठ दिवसांचा जनता कर्फ्यू

चंद्रपूर :  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा,कोरपणा, जिवती व गोंडपिपरी या चारही तालुक्यात दिनांक 19 ते 26 एप्रिल दरम्यान आठ दिवसांच्या जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जनतेनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन आठ दिवसांचा जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

उपविभागीय कार्यालयात बैठकीत निर्णय(Decision in the meeting at the sub-divisional office)

सोमवार दिनांक १९ एप्रिल ते २६ एप्रिल सोमवार सकाळी ८ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत दूध विक्रेत्यांना मात्र यातून वगळण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या विदारक परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले. जनतेचे आरोग्य व जिवीताचे संरक्षण करण्यासाठी स्वतः जनतेलाच पुढाकार घेऊन या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे, असे मत यावेळी मांडण्यात येऊन जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला आमदार सुभाष धोटे, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, तहसिलदार हरीश गाडे, कोरपना तहसिलदार महेंद्र वाकलेकर, राजुरा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे, गडचांदूर पोलीस निरीक्षक गोपाल भारती, कोरपना पोलीस उपनिरीक्षक शिवराज जाधव, राजुरा नगर परिषद मुख्यधिकारी आर्शिया जुही, जिवती मुख्याधिकारी विशाखा शेळकी, कोरपना नगर पंचायतीचे मयूर कांबळे, राजूरा पालिकेचे विरोधी पक्ष नेते रमेश नळे,राजु डोहे,राजुरा व्यापारी असोसिएशनचे सतीश धोटे,गोपाल झंवर,अशोक राव,जितेंद्र देशकर,गणेश रेकलवार,अश्विन पटेल,राजू बंदाली,खालिदभाई ,बंडू कलूरवार यांच्यासह अनेक अधिकारी,कर्मचारी व व्यापारी उपस्थित होते.

प्रत्येकाला दोन दोन दिवस दया; छोटे व्यावसायिकांची मागणी

Give each one two days; Demand for small businessmen.

मुल : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पंधरा दिवसांचा कडक निर्बंध असलेला लाकडाउन लागु केलेला आहे.त्यात अत्यावष्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद केले आहे.परंतु यामुळे इतर व्यावसायीकांवर उपासमारीची पाळी आली आहे.त्यामुळे सगळयांना समान संधी म्हणन प्रत्येकाला दोन दोन दिवस व्यवसाय करण्याची संधी दयावी अशी मागणी येथील छोटे व्यावसायीकांनी आणि बंदचा फटका बसलेल्या इतर व्यावसायीकांनी केली आहे.

अत्यावश्यक सेवेमध्ये किराणा,बेकरी,हाटेल आणि मेडीकल दुकाने सुरू आहेत.मेडीकल सेवा अत्यावष्यक असल्याने ती चोविस तास सुरू राहली तरी काही हरकत नाही.

परंतु किराणा आणि बेकरी तसेच हाटेल अत्यावष्यक सेवा म्हणुन दररोज सुरू ठेवुनइतर व्यावसायीकांवर शासनाने दुजाभाव केल्याचा आरोप होत आहे. उन्हाळयाचे दिवस असल्याने विदयुत उपकरणांसाठी,कुलर पंखा,बल्ब तसेच इतर कारणांसाठी इलेक्ट्रिकचे दुकान आवष्यक आहे.नागरिकांना कपडयांची आवष्यकता असल्याने कापड दुकाने आणि रेडीमेट दुकाने आवष्यक आहे.

झेराक्स आणि इतर इंटरनेट कॅफे दुकाने आवष्यक झाली आहेत.या सर्वं सेवांना दोन/ दोन दिवसांचा सुदधा कालावधी मिळाल्यास त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सहज पणे मिटण्याची शक्यता व्यावसायीकांनी व्यक्त केली आहे.

इतर दुकाने बंद असल्याने ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने मागणीचा विचार करून इतर सेवांना दोन दोन दिवस त्यांची दुकाने सुरू करण्याची परवानगी दयावी अशी मागणी छोटे व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे.

In the wake of corona infection, the state government has imposed a 15-day strict lockdown, shutting down all businesses except for excessive services. But this has led to starvation on other businessmen. Therefore, small businessmen and other traders who have been hit by the bandh have demanded that everyone be given the opportunity to do business for two days, calling them equal opportunities.

 

Social Media