मुंबई : मुंबईतून गोव्याला निघालेल्या कॉर्डेलिया क्रूझवरील(Cordelia Cruise) रेव्ह पार्टीप्रकरणी(Rave party) एनसीबीने आज पुन्हा आठ जणांना अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील संशयितांची संख्या आता १६ झाली आहे.
पुन्हा आठ जणांना अटक(Eight arrested again)
श्रेयस सुरेंद्र नायर, मनीष राजगारिया, अविन साहू, गोपालजी आनंद, समीर सहगल, मानव सिंघल आणि भास्कर अरोरा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत . त्यांच्या कडून २.५ ग्रॅम एमडीएमएच्या (एक्स्टसी) गोळ्या, ५४.३ ग्रॅम मेफेड्रोन, चरस आणि हायड्रोपोनिक वीड @ मल्टी स्ट्रेन कॅनाबीस @ गांजा हा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे. एनसीबीने मोहक जसवालकडे केलेल्या प्राथमिक चौकशीच्या आधारे, सोमवारी जोगेश्वरी येथे छापा टाकला.या छाप्यात एका व्यक्तीला २.५ ग्रॅम एमडीएमएच्या (एक्स्टसी) गोळ्या, ५४.३ ग्रॅम मेफेड्रोनसह ताब्यात घेतले. इश्मीतसिंग चड्ढाच्या प्राथमिक चौकशीच्या आधारे, एनसीबी मुंबईच्या टीमने गोरेगाव येथे फॉलो -अप ऑपरेशन सुरू केले. चरसच्या छोट्या प्रमाणासह श्रेयस सुरेंद्र नायरला अटक केली. त्यानंतर जहाजात पाहुणे म्हणून आमंत्रित केलेल्या मनीष राजगेरियाला याला अटक केली. त्याच्याकडे हायड्रोपोनिक वीड-मल्टी स्ट्रेन कॅनाबीस हे मादक पदार्थ सापडले. दरम्यान क्रूझ कॉर्डेलियामध्ये प्रवास करणाऱ्या अविन साहूला अटक केली.
अटकेनंतर त्यांना दुपारी १२.३४ वाजता जे . जे . रुग्णालय वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले . वैद्यकीय चाचणीनंतर त्यांना स्थानिक कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टानं त्यांना ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावली . त्यानंतर क्रूझमध्ये रेव्ह पार्टीचं आयोजन करणाऱ्यां गोपाल जी आनंद, समीर सहगल, मानव सिंघल आणि भास्कर अरोरा या चार जणांना एनसीबीने आज अटक केली. असे एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे. असे एनसीबी चे मुंबई प्रादेशिक संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede)यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा –
केंद्रातील मोदी व उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा !: नाना पटोले