‘एकदा येऊन तर बघा’ ८ डिसेंबरला तुमच्या भेटीला

‘एकदा येऊन तर बघा’ या मराठी चित्रपटाची रसिक प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. १४ विनोदवीर एकत्र आणत दिग्दर्शक प्रसाद खांडेकर(Prasad Khandekar) यांनी विनोदाची जबरदस्त मेजवानी रसिकांसाठी आणली आहे. हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता ,पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. ‘एकदा येऊन तर बघा ’ आता २४ नोव्हेंबर ऐवजी ८ डिसेंबरला तुमच्या भेटीला येणार आहे . आता प्रेक्षकांना या चित्रपटाची मेजवानी ८ डिसेंबरला चित्रपटगृहात जाऊन घेता येईल.

दिवाळीमध्ये चित्रपटगृहांमधील हिंदी-मराठी चित्रपटांची वाढलेली गर्दी लक्षात घेता दोन आठवडे थांबून ८ डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपटाच्या टीमने घेतला आहे.

८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रसाद खांडेकर(Prasad Khandekar) दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती,दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे. लेखक अभिनेता प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे. सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार,गिरीश कुलकर्णी,तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव(Namrata Sambherao), ओंकार भोजने(Onkar Bhojne) राजेंद्र शिसातकर वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार आदि कलाकारांची भली मोठी फौज चित्रपटात आहे.

Social Media