एकनाथ शिंदे माणुस म्हणून मला खूप आवडतात : जेष्ठ अभिनेता सचिन पिळगावकर

“अनाथांचा नाथ एकनाथ” गाण्याचे धुमधडाक्यात अनावरण

ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे संकटात नेहमी धावून जाताना मी पाहिलेले आहे. राज्यात कुठेही आपत्ती परिस्थिती निर्माण झाली असेल तेव्हा मदतीसाठी ठाण्यातील एकनाथ शिंदे यांचे पुढे असते. त्यामुळे माणूस म्हणून एकनाथ शिंदे मला खूप आवडतात अशी भावना जेष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर(Sachin Pilgaonkar) यांनी व्यक्त केली. एससीआर कम्युनिकेअर, अपूर्वा प्रोडक्शन आणि संजय पाटील प्रस्तुत “अनाथांचा नाथ एकनाथ” या गाण्याचे अनावरण पिळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. गीतकार संदिप माळवी(Lyricist Sandeep Malvi) यांनी लिहिलेल्या या गीताला पहाडी आवाज म्हणून ओळखला जाणाऱ्या तरुण संगीतकार अवधूत गुप्ते यांनी आवाज दिला आहे.

ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात भव्य कार्यक्रमाचे आयोजन

ठाणे जिल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे याच्या वाढदिवसानिमित्त पूर्व संध्येला ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात(Dr.Kashinath Ghanekar Natyagriha) भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा, खासदार श्रीकांत शिंदे,आमदार रवींद्र फाटक,स्थायी समिती सभापती संजय भोईर,सभागृह नेते अशोक वैती, ठाणे महापौर नरेश म्हस्के, यांच्यासह राजकीय तसेच चित्रपट सृष्टीमधील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अवधूत गुप्ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांचा स्पर्शनंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचा स्पर्श मला खूप जाणवला आहे. त्याची कामाची पद्धत इतराना मदत करण्याचा पध्दत मला खूप आवडते. त्याचे गाणे गाण्याचे संधी मला मिळाली हे माझे भाग्य लाभले असल्याचे देखील गुप्ते यांनी सांगितले. ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे हे समाजातील सदस्यांसाठी आदर्श असल्याचे सांगितले आणि नुकत्याच झालेल्या साथीच्या काळात त्यांनी केलेले काम अतुलनीय असल्याचे ते म्हणाले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा अनेकांना लाभलेला आधार मी पाहिला असून काही वर्षांपूर्वी मी त्याच्या शब्दाची धार ही मी पहिली आहे अस मत यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी या कार्यक्रमानिमित्ताने सांगितले.

एकनाथ शिंदे यांच्या कामावर आधारित व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर काही वेळातच या व्हिडिओला लाखो लाईक मिळाली. गीतकार संदीप मालवी यांनी लिहिलेल्या गाण्याचे सर्वच स्थरातून कौतुक केले जात आहे.

Social Media