देशद्रोह्यांना पाठिशी घालणा-यांसोबत चहापानाची वेळ आली नाही हे बरेच झाले : मुख्यमंत्री शिंदे!

मुंबई  :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget Session)चहापानावर बहिष्कार (boycott)घालणा-या विरोधकांच्या आरोपांना सडेतोड भाषेत उत्तरे देत बरे झाले देशद्रोही मंत्र्याचा राजीनामा घेवू न शकणा-यांच्या सोबत चहापान टळ ले अश्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार जनहिताच्या भावनेने महत्वाचे निर्णय घेत आहे त्याला लोकांचा प्रतिसाद मिळत असल्यानेच विरोधकांच्या पोटात दुखत आहे अशी टिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. गेल्या अडिच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठप्प झालेल्या विकासाला केवळ सात महिन्यात आमच्या सरकारकडून चालना देण्यात आली   असून त्यामुळे विरोधकांकडून केवळ विरोधासाठी विरोध सुरू आहे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी म्हटले आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाच्या कार्यक्रमानंतर मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यानंतर पत्रकार परीषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधीपक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांचा तिखट भाषेत समाचार घेतला. ते म्हणाले की मी पक्षात बंड कैल मात्र पवार यांच्यासारखे एका दिवसांत तीनदा निष्ठा बदल ल्या नाहीत मी आजही शिवसैनिकच आहे मात्र अजित पवार आता कडव्या शिवसैनिकासारखे का बोलत आहेत याचे कारण त्यांनी सांगायला हवे. मुख्यमंत्री म्हणाले की शिवसेना अधिकृतपक्ष म्हणून  आयोगाने मान्यता दिल्यानंतर आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली नसल्याने आम्ही अधिकृतच आहोत मात्र अनधिकृत बेकायदा सरकार असे विरोधकांकडून का सांगण्यात येत आहे याचे कारण लोकांना माहिती आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की जनतेच्या हिताचे रखडलेले निर्णय आम्ही सात महिन्यात घेतल्याने केंद्र सरकारने देखील सढळपणे मदत केली आहे, त्यासाठी बाहेर जावे लागते घरात बसून निर्णय होत नाहीत असा चिमटा त्यांनी उध्दव ठाकरेंच्या सरकारला घेतला. मुख्यमंत्री म्हणाले की आम्हाला महाराष्ट्र द्रोही म्हटले जात आहे मात्र ज्यांनी दाऊदच्या बहिणीशी व्यवहार करत देशद्रोह केला आहे त्यां मंत्र्याना अटक झाल्यावर साधा राजीनामा घेण्याचे धैर्य राष्ट्रवादीचे नेते पवार दाखवू शकले नाहीत ज्यांनी देशद्रोह्यांना पाठिशी घातले त्यांच्यासोबत चहापानाची वेळ आली नाही हे एका अर्थी बरेच झाले असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

महाविकास आघाडीच्या काळात नवनीत राणा रवी राणा कंगना राणावत नारायण राणे केतकी चितळे गिरिश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सत्ताबळाचा वापर करत अटकेच्या कारवाया करण्यात आल्या होत्या मात्र सध्या संजय राऊतांपासून आदित्य ठाकरेंपर्यंत हल्ला झाल्याचा कांगावा करत राजकारण केले जातआहे असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्याच्या जाहीराती आणि चाहापानावर खर्च केला जात असल्याच्या टिकेचा समाचार घेताला त्यांनी महाविकास आघाडीच्या काळातही २५० कोटीच्या जाहीराती दिल्या गेल्या आम्ही मात्र ४५ कोटी खर्च केले कारण लोकांच्या हिताचे निर्णय त्यांच्यापर्यंत पोचावे हे महत्वाचे आहे, किमान २ वर्ष बंद झालेल्या वर्षा बंगल्यावर आता किती लोक येतात ते  तरी विरोधकांनी मान्य करावे आणि घरी आलेल्यांना चहापाणी करण्याची संस्कृती आहे त्याचा खर्च तरी विरोधकांनी काढू नये असे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारी जाहीरातीवर अन्य राज्य हो खर्च करतात त्या तुलनेत हा खर्च कमीच आहे असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की सात महिन्यात सामान्य माणसांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत ही विरोधकांची पोटदुखी असून आमच्या सरकारचे आम्ही जावू तेथे जोशात स्वागत कैले जात असून लोकांच्या मनातील प्रेम आणि आदर मिळत अहे  म्हणून आमच्या पक्षात रोज प्रवेश होत असून समतोल विकासासाठी केवळ बोलत न राहता आम्ही काम करत असल्याने विरोधकांकडून टिका केली जात आहे.

येत्या काळात विधान परिषद विरोधीपक्ष नेते पदाचा निर्णय उपसभापती घेतील तर अर्थसंकल्प मांडण्यासाठी राज्यमंत्री  नसले तरी संसदीय कामकाज मंत्री येथे अर्थसंकल्प सादर करू शकतात. सध्या सरकारचा विस्तार होणार नसून काम नीटपणे सुरू असल्याने तुर्तास त्याची शक्यता नाही तसेच आपण दिल्लीला तातडीच्या दौ-यावर जात नसल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले की या अधिवेशनात ८ तारखेला आर्थिक पहाणी अहवाल तर ९ तारखेला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. ते म्हणाले चार आठवडे अधिवेशन चालणार असून गेल्या तीन वर्षात प्रथमच संपूर्ण कालावधीचे हे अधिवेशन असेल, फडणवीस म्हणाले की, या अधिवेशनात परिषदेत राहिलेली ३ विधेयके आणि नव्याने सात अश्या दहा विधेयकांनामंजूरी दिली जाणार आहे, त्यात लोकायुक्तांच्या कायद्याला मंजूरी देण्यासाठी विरोपधकांना सहकार्य करण्याचे आवाहन आम्ही करत आहोत.

राहूल गांधी यानी मागील काळात महाविकास आघाडीचे सरकार असताना सात त्याने स्वा सावरकरांचा अवमान केला आणि आज सावरकरांच्या स्मृतीदिनी देखील त्यानी अवमान केल्यानंतरही उध्दव ठाकरे यांच्याकडून त्यांचा निषेध करण्यात आला नाही. त्यांची काय मजबूरी आहे ते त्यानी सांगावे अशी टिकाही फडणवीस यांनी केली. सोलापूरात कांदा शेतकरी राजेंद्र चव्हाण यांना केवळ दोन रूपयांचा चेक दिल्याप्रकरणी सूर्या ट्रेडर्स या परवाना धारक कंपनीचा परवाना निलंबीत केला असून वाहतूक खर्च वजा न करता त्याना पैसे देण्याचे आदेश नियमानुसार देण्यात आले आहेत, मात्र ही चूक अनावधानाने झाल्याचे सूर्या ट्रेडर्श यानी सांगतल्याचे फडणवीस म्हणाले. काद्याला बाजूच्या तीन देशात परकीय चलनाचा तुटवडा असल्याने भाव नाही तर सध्या देशात सात राज्यात काद्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाल्याने देशांतर्गत मागणी कमी आहे त्यामुळे शेतक-याना कमी भाव मिळत असल्याचे फडणवीस म्हणाले. मंत्रिमंडळात याबाबत चर्चा  झाली असून त्याबाबत केंद्र सरकारच्या मदतीने निर्णय घेतला जाण्याची शक्यता आसल्याचे फडणवीस म्हणाले.

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्या प्रकरणात राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारे गुन्हेगारांना पाठिशी घातले जात नसून आवश्यक त्या कायद्यानुसार कारवाई केली जात असल्याचे ते म्हणाले मात्र विरोधकांकडून जणू काही सरकारनेच हि हत्या केल्याचा देखावा केला जात असल्याचा आरोप त्यानी केला. राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेवून त्यांना आवश्यक संरक्षण देण्याचे कर्तव्य सरकार बजावत आहे मात्र या मुद्याचे विनाकारण राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे फडणवीस म्हणाले.

राज्यातील शेतक-यांना महाविकास आघाडीच्या काळात केवळ चार हजार कोटीची मदत मिळाली आमच्या सरकारने केवळ सहा महिन्यात बारा हजार कोटीची मदत दिली असा दावाही त्यानी केला. पोट निवडणुकांच्या प्रचारात पंढरपूरला अजित पवार नंदेडला अशोक चव्हाण ठाण मांडून बसेल होते मात्र आता ते आमच्यावर विनाकारण टिका करत असल्ताचे फडणवीस म्हणाले. छत्रपती संभाजीनगर आणि  धाराशिव बाबत महसूल विभागाच्या अधिसूचना दोन दिवसांत जारी होतील त्यानंतर टप्याटप्याने जिल्हा तालुका विमानतळ रेल्वे स्थानकांच्या नामांतराची प्रक्रिया केली जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाने लाड पागे समितीच्या निकषानुसार सफाई कामगारांच्या सेवा घेण्याबाबत निर्णय घेतला असून या कामगारांना त्यांच्या वारसाना त्यांच्या पात्रतेनुसार तृतीय आणि चतुर्थश्रेणीत त्यांच्या सेवा निवृती नंतर रोजगार देण्याची मुभा या कायद्याने देण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

Social Media