एकनाथ शिंदेंचा नवा पैलू  ‘द हार्ड बार्गेनर! ‘

मुंबई,  दि. २२  ( किशोर  आपटे) : राज्य मंत्रिमंडळाच्या  खातेवाटपाला  २१  डिसेंबरला अधिवेशन संपताच मुहूर्त मिळाला. अधिवेशन सुरू होण्याअगोदर मंत्रिमंडळ विस्तार आणि अधिवेशन संपल्यावर  खातेवाटप  जाहीर करण्यात आले.  या मागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांचा वरचष्मा दिसत असला तरी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीतून पायउतार होणारे एकनाथ शिंदे हार्डबार्गेनर  ठरले आहेत. कारण स्वत:कडे असलेल्या आधीच्या खात्यांव्यतिरिक्त नव्याने त्याला जोडून आणखी खाती पदरात पाडून घेण्यात त्यांना यश आले आहे.

अजितदादांकडे तिजोरीच्या चाव्या पण शिंदेकडे इनकमिंग सोर्स!

मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे गृह आणि सामान्य प्रशासन (जीएडी), ऊर्जा (नवीनीकरण ऊर्जा वगळून), विधी व न्याय आणि माहिती-जनसंपर्क ही  खाती कायम ठेवून आपला शब्द खरा केला  असला तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde)  यांनी देखील आपल्याला हवे तसे महत्व मिळवून घेण्यात यश मिळवले आहे. त्यांच्याकडे उध्दव ठाकरें मुख्यमंत्री असतानाचे नगरविकास खाते तर कायमच राहिले, शिवाय त्यांनी त्याला पुरक भाजपकडे असणारे महत्वाचे गृहनिर्माणखाते पदरात पाडून घेतले आहे. भविष्यात धारावी विकासाचा अदानीचा महत्वाचा प्रकल्प होवू घातला आहे. ते पाहता शिंदे यांचा ‘की रोल’  राहणार असून त्यांचे राजकीय बॉस  असणारे आजी-माजी मुख्यमंत्र्याना त्यांना या प्रकल्पातील सहभागासाठी महत्व द्यावे लागणार आहे. हा प्रकल्प फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या टर्म मध्ये आकारास आला आहे. तर त्याची निविदाप्रक्रिया ठाकरे मुख्यमंत्री असताना  पूर्णत्वास आली आहे. तर शिंदे यांच्या काळात त्यावर गतीने बरेच काम पूर्ण झाले आहे. आता समृद्धी महामार्गासारखाच हा मोठा प्रकल्प त्यांच्या देखभालीत पुढे जाणार आहे. या शिवाय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम-एमएसआरडीसी) हे रस्ते विकासाचे जुने खातेही त्यांनी कायम राखले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे फारशी महत्वाकांक्षा न दाखविल्याने जुनेच वित्त व नियोजन खाते कायम राहिले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे फारशी महत्वाकांक्षा न दाखविल्याने जुनेच वित्त व नियोजन खाते कायम राहिले आहे. मात्र शिंदेइफेक्ट चा समतोल राखण्यासाठी त्यांच्याकडे उत्पादन शुल्क खाते चालत आले आहे. त्यामुळे फडणवीस यांनी शिंदेच्या बरोबरीने पवार यांचा सन्मान राखत समतोल साधल्याचे दिसत आहे.

भाजपमध्ये मूळपक्षात बाजुला पडलेल्या नेत्यांना सन्मान देवून त्यांचे समाधान करताना महसूल खाते चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले आहे. तर चंद्रकात पाटील. मंगलप्रभात लोढा या ज्येष्ठांचा सन्मान त्यांच्या पूर्वीच्या खात्यांना हात न लावल्याने राखण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे  आता दुसऱ्या क्रमांकावर असले तरी दुय्यम स्थानी नाहीत हा संदेश खातेवाटप करताना देण्यात आला आहे.  त्यामुळे मंत्रिमंडळात भाजपनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे महत्वाची खाती आहेत.

नगरविकास,गृहनिर्माण,सार्वजनिक बांधकाम खाती तसेच एमएमआरडी, सिडको, एमएसआरडीएवर एकनाथ शिंदे यांचाच ताबा राहणार आहे. राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधीही एकनाथ शिंदेंच्या हाती असणार आहे. अजित पवारांकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असल्यातरी खर्चाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेंकडे राहणार आहेत. एकनाथ शिंदेंनी गृह खात्यासाठी आग्रह धरला होता. मात्र एकनाथ शिंदेंनी गृहनिर्माण खातं मिळवल्याने एकनाथ शिंदेंनी नव्या काळातील महत्वाचे प्रकल्प हाती राखल्याने त्यांचा दबदबा कायम राहणार असल्याने ते हार्डबार्गेनमध्ये यशस्वी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिंदेच्या शिवसेनेला नऊ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपद मिळाली आहेत. त्यात गृह सह भाजपच्या महत्वाच्या खात्यांची राज्यमंत्रिपद आपल्याकडे राखून एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये आपण नंबर वन नसलो तरी आपल्याशिवाय सरकार पूर्ण होवू शकत नसल्याचे दाखवून दिले आहे.

भाजपकडून अजितदादां पेक्षा शिंदेंगटाला झुकते माप ?

शिवसेना. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) ही महत्त्वाची खाती तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग आणि मराठी भाषा मंत्रालये देण्यात आली आहेत. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि शालेय शिक्षण यासारखी महत्त्वाची खाती अनुक्रमे प्रकाश आबिटकर आणि दादा भुसे यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. भरत गोगावले यांच्याकडे परिवहन, गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा आणि स्वच्छता, संजय राठोड यांच्याकडे मृद व जलसंधारण, पर्यटन, खाणकाम, शंभूराज देसाई यांच्याकडे माजी सैनिक कल्याण आणि संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्रिपदांव्यतिरिक्त, पक्षाला राज्यमंत्रीपदेही मिळाली आहेत. आशिष जैस्वाल यांच्याकडे वित्त आणि नियोजन, कृषी, मदत आणि पुनर्वसन, कायदा आणि न्यायव्यवस्था, कामगार, योगेश कदम यांना गृह (शहरी), महसूल, ग्रामीण विकास आणि पंचायती राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न या खात्यांचे राज्यमंत्री बनवण्यात आले आहे. नवीन सरकारमध्ये नऊ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री शिवसेनेला मिळाले आहे. शिवसेने पूर्वी वगळण्यात आलेल्यांसह  पाच जणांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. तर तीन जणांना मंत्रिमंडळातुन वगळून पक्षावरही आपला शब्द अंतिम र‍ाहिल्याचे दाखवून दिले आहे.

एकनाथ शिंदेंकडे महत्वाच्या खात्यांची धुरा?

नगरविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग.

शिवसेनेच्या कोणत्या मंत्र्यांकडे कुठली खाती?

कॅबिनेट मंत्री

1. उदय सांमत – उद्योग व मराठी भाषा
2. प्रताप सरनाईक – वाहतूक
3. शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
4. भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन, मीठ पान जमीन विकास
5. प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
6. दादा भूसे – शालेय शिक्षण
7. गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
8. संजय राठोड – मृदा व जलसंधारण
9. संजय शिरसाट – सामाजिक न्याय

राज्यमंत्री

10. योगश कदम –  ग्रामविकास, पंचायत राज
11. आशिष जैस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

 

 

‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ पुस्तिकेचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

Social Media