राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर! या तारखेला होणार मतदान

मुंबई : राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. या सर्व 56 जागांवरील खासदारांचा कार्यकाळ हा येत्या 2 एप्रिल 2024 ला संपणार आहे. त्यापूर्वी 27 फेब्रुवारीला या 56 जागांसाठी मतदान होणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून(Central Election Commission) या निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. या निवडणुकीची अधिसूचना 8 फेब्रुवारी 2024 ला निघणार आहे. तर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे. तसेच अर्जाची छाननी 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत होणार आहे.

त्यानंतर अर्ज मागे घेण्याची मुदत ही 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. राज्यसभेच्या या 56 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारी 2024 सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेदरम्यान मतदान होणार आहे. तर त्याचदिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी केली जाणार आहे.

Social Media