EPFO Facility: पीएफ खात्यातूनही LIC प्रीमियम भरता येतो, जाणून घ्या EPFO च्या कामाचे नियम 

नवी दिल्ली : EPF म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही सर्व पगारदार व्यक्तींना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर आर्थिक लाभ देण्यासाठी एक योजना आहे. भारताच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे प्रक्रियेचे परीक्षण केले जाते. 20 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कोणत्याही संस्थेने EPFO ​​मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) ही एक संस्था आहे. या संस्थेने EPFO ​​सदस्यांना आर्थिक गरज भासल्यास त्यांच्या PF खात्यातून विमा प्रीमियम भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा वापर  जेव्हा खूप गरज असेल तरच त्याचा वापर  करा कारण भविष्य निर्वाह निधी खात्यातील पैसे हे तुमचे कष्टाचे पैसे आहेत आणि ते भविष्यासाठी जतन केले पाहिजेत.

एलआयसी प्रीमियम भरता येतो

तुम्हाला हे माहित असले पाहिजे की EPFO ​​ने ही सुविधा त्यांच्या ग्राहकांना किंवा खातेदारांना फक्त भारतीय आयुर्विमा निगम (LIC) पॉलिसीचा प्रीमियम भरण्यासाठी दिली आहे. इतर कोणत्याही कंपनीच्या विमा पॉलिसीसाठी तुम्ही ही सुविधा घेऊ शकत नाही.

ईपीएफओचा प्रत्येक सदस्य या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाही. यासाठी पीएफ खातेधारकांना ईपीएफओकडे फॉर्म 14 सबमिट करावा लागेल. हा फॉर्म  ईपीएफओच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल.

जाणून घ्या EPFO च्या कामाचे नियम

वास्तविक, EPFO ​​कडून LIC पॉलिसी प्रीमियम भरण्यासाठी एक अट देखील आहे की LIC च्या 2 वर्षांच्या प्रीमियमइतकी रक्कम तुमच्या PF खात्यात राहते. तुमच्या पीएफ खात्यात यापेक्षा कमी रक्कम असल्यास तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाही.

जेव्हा तुमच्या अर्जावर प्रक्रिया केली जाते, तेव्हा LIC पॉलिसी प्रीमियम तुमच्या EPFO ​​खात्यातून प्रीमियमच्या देय तारखेला किंवा त्यापूर्वी कापला जाईल.

फॉर्म 14 म्हणजे नक्की काय?

पीएफ खातेधारक EPFO ​​ला त्याच्या LIC पॉलिसीचा प्रीमियम भरण्यास सांगू शकतो, तथापि त्याआधी त्याला फॉर्म 14 भरावा लागेल आणि सबमिट करावा लागेल. यासोबत, जेव्हा तुमची LIC पॉलिसी आणि EPFO ​​खाते लिंक केले जाईल, तेव्हा PF खात्यातून LIC पॉलिसीचा प्रीमियम कापला जाईल.

Social Media