गेल्या केवळ चार महिन्यात ५२ हजार १६९ बेरोजगारांना कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून रोजगार : नवाब मलिक यांची माहिती

मुंबई, दि. ६ : कोरोनाच्या दुस-या लाटेत राज्यात कडक निर्बंध लागले असताना अनेकावर बेरोजगारीची वेळ आली. मात्र विविध उपक्रमांमधून चालू वर्षात जानेवारी ते एप्रिल अखेर ५२ हजार १६९ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. तर मागील वर्षी (२०२०_ राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, चालू वर्षात जानेवारी ते एप्रिलअखेर ५२ हजार १६९ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे रोजगार स्वयंरोजगार मंत्री नबाब मलिक(Nawab Malik) यांनी दिली.

८ हजार २५९ उमेदवारांना नोकरी(8,259 candidates employed)

तर एप्रिलमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे ८ हजार २५९ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ३ हजार ९९५, नाशिक विभागात १ हजार ३०२, पुणे विभागात १ हजार ७५७, औरंगाबाद विभागात ८६९, अमरावती विभागात ३१४ तर नागपूर विभागात २२ इतके बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळाला आहे. ते म्हणाले की, कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात एप्रिल २०२१ मध्ये ८ हजार २५९ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला.

१९ हजार ०५५ उमेदवारांची नोंदणी(Registration of 19,055 candidates)

महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो असे मलिक म्हणाले. ते म्हणाले की, एप्रिल २०२१ मध्ये विभागाकडे १९ हजार ०५५ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली. यात मुंबई विभागात ५ हजार ८०९, नाशिक विभागात २ हजार ७५७, पुणे विभागात ४ हजार ९९७, औरंगाबाद विभागात ३ हजार ३७०, अमरावती विभागात १ हजार १४४ तर नागपूर विभागात ९७८ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

इथे करा नोंदणी(Register here)

बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.

In the second wave of corona, many were hit by unemployment when the state was under severe restrictions. However, 52,169 unemployed people have been provided employment from January to April end in the current year through various initiatives. State Employment Self Employment Minister Nawab Malik said that last year (2020_ 1 lakh 99 thousand 486 candidates were able to get employment in the state, 52,169 unemployed people have been provided employment from January to april in the current year.

Social Media