प्रसिद्ध गीतकार माया गोविंद यांचे निधन, अनेक चित्रपट ते ‘महाभारत’साठी लिहिली गाणी

मुंबई : 350 हून अधिक हिंदी चित्रपटांसाठी गाणी लिहिणाऱ्या सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका आणि गीतकार माया गोविंद(Maya Govind) यांचे गुरुवारी, 7 एप्रिल रोजी निधन झाले. माया गोविंद(Maya Govind) यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब होत होती. कवयित्री-लेखिका यांना 20 जानेवारीला मेंदूतील रक्त गोठल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर 26 जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयातून त्यांच्या घरी हलवण्यात आले आणि तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले, गीतकार माया गोविंद यांच्या मृत्यूबाबत त्यांचा मुलगा अजय गोविंद यांनी पुष्टी केली आहे.

माया गोविंद या सुप्रसिद्ध लेखिका आहेत, ज्यांनी 80 च्या दशकात सर्व टीव्ही मालिका आणि चित्रपट उद्योगातील 350 हून अधिक चित्रपट आणि संगीत अल्बमसाठी गाणी लिहिली आहेत. मायाने चित्रपट गीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि पुढे ‘सौतेला’, ‘रजिया सुलतान’, ‘बाल ब्रह्मचारी’, ‘आर या पार’, ‘गर्व’, अक्षय कुमारचा ‘मैं खिलाडी तू अनाडी’, अमिताभ बच्चन यांच्या ‘लाल बादशाह’ आणि ‘याराना’ सारख्या 350 चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली.

यासोबतच त्यांनी दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘महाभारत’ या मालिकेसाठी अनेक गाणी, दोहे आणि श्लोक लिहिले. माया गोविंद यांनी 80 च्या दशकात चित्रपटांसह अनेक टीव्ही मालिका आणि संगीत अल्बमसाठी गाणी लिहिली, त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले.  त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन जगताला धक्का बसला आहे. तसेच चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून गीतकाराला श्रद्धांजली वाहत आहेत.


‘भारतात बिकिनी घालणे सामान्य नाही’ : ‘जर्सी’ अभिनेत्री मृणाल ठाकूर

गुरमीत चौधरी आणि देबिना यांच्या घरी नवरात्रीत मुलीचा जन्म

Social Media