फरहान अख्तरचा बहुचर्चित सिनेमा ‘तूफान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, या दिवशी प्रदर्शित होणार ट्रेलर….

मुंबई : अभिनेता फरहान अख्तरचा (Farhan Akhtar) बहुचर्चित सिनेमा ‘तूफान’(Toofan) दिर्घकाळापासून चर्चेत आहे. यापूर्वी हा चित्रपट सिनेमाघरांमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आता तूफान चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

या गोष्टीची माहिती स्वतः चित्रपटाचा प्रमुख अभिनेता फरहान अख्तरने दिली आहे. त्याने समूह माध्यमांवर तूफान चित्रपटाशी संबंधित दोन पोस्टर सामायिक केले आहेत. या पोस्टरसह चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. फरहान अख्तरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर तूफान चित्रपटाचा पोस्टर सामायिक केला आहे. या पोस्टरमध्ये फरहानचे दोन वेगवेगळे अंदाज पहायला मिळत आहेत.
पोस्टरमध्ये एकीकडे तो बॉक्सिंग करताना दिसून येत आहे तर दुसरीकडे चित्रपटाची अभिनेत्री मृणाल ठाकूरसोबत त्याचा रोमॅँटिक अंदाज देखील पहायला मिळत आहे. या पोस्टरसह फरहान अख्तर ने विशेष कॅप्शन देखील लिहिले आहे. त्याने लिहिले आहे की, ‘आयुष्य तुम्हाला तोपर्यंत तोडू शकत नाही जोपर्यंत प्रेम तुमच्याशी जोडलेले आहे. (‘जिंदगी आपको तब तक नहीं तोड़ सकती जब तक प्यार आपको जोड़े रखे।).’ ट्रेलर ३० जून रोजी प्रदर्शित होईल.

‘दोस्ताना2’  चित्रपटात कार्तिक आर्यनच्या जागी दिसणार अक्षय कुमार 

सोशल मीडियावर तूफान चित्रपटाचा पोस्टर वेगाने व्हायरल होत आहे. फरहान अख्तरचे चाहते आणि अनेक सोशल मीडिया वापरकर्ते पोस्टरला पसंती देत आहेत. याशिवाय प्रतिक्रिया देऊन पोस्टरचे कौतुक देखील करत आहेत. चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर, फरहान अख्तरने या चित्रपटात एका स्ट्रीट बॉक्सरची भूमिका साकारली आहे. तसेच मृणाल ठाकूर आणि परेश रावल मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. याव्यतिरिक्त सुप्रिया पाठक कपूर, हुसैन दलाल, डॉ. मोहन अगाशे, दर्शन कुमार, आणि विजय राज महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तर, चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले आहे.
Farhan Akhtar is going to bring ‘Toofan’ soon, the trailer of the film will be released on this day.


इरफान खानचा ‘वारसा’ पुढे नेण्याचा शूजित सरकारचा निर्णय, बाबिलसोबत चित्रपट बनवण्याची तयारी…. –

इरफान खानचा ‘वारसा’ पुढे नेण्याचा शूजित सरकारचा निर्णय, बाबिलसोबत चित्रपट बनवण्याची तयारी….

Social Media