अमरावती : वर्धा जिल्ह्यातील चिस्तूर या गावाजवळ अमरावती वरून नागपूर(Amravati to Nagpur) कडे जात असलेल्या एका कारच नियंत्रण सुटल्याने अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र ६ वरील नदीच्या दरीत कार कोसळून चालक सह प्रवासी ठार झाल्याची घटना सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
तळेगांव श्यामजीपंत च्या चिस्तुर गावाजवळ एका एम एच ३०, पी- ३२१४ क्रमांकाची स्विफ्ट डिझायर गाडीचा भीषण अपघात झाला आहे, ज्यामध्ये तिघे जागीच ठार झाले तर एक जण आश्चर्यकारक वाचला आहे, मृतांमध्ये अमित भोवते वय 32 वर्ष रा.बडनेरा, शुभम गारोडे वय 25 वर्ष रा.अमरावती, आशिष माटे रा. राजुरा जि. अमरावती, हे तिघे जागीच ठार झाले असून तर शुभम भोयर हा सुखरूप वाचला आहे, हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे ,तर एकाचा मृतदेह हा झाडावर अडकला होता तर दुसरा गाडीत अडकला होता तिसरा मृतदेह बाजूला पडून होता.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा असे सांगण्यात आले आहे. कारण मोठे पळसाचे झाड तोडून ही गाडी उडून बाजूला फेकली असावी असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक पवन भांबुरकर, जमादार राजेश साहू, सुधीर डांगे,श्याम गहाट,राहुल अमोने, अनील चिलघर, देवेंद्र गुजर,विजय उईके, रमेश परबत यांनी मोठी कसरत करून मृतदेहांना उत्तरीय तपासणी साठी पाठवले.
The incident took place around 7 am when a car traveling from Amravati to Nagpur near Chistur village in Wardha district lost control and the car crashed into the river valley on Amravati Nagpur National Highway No. 6 killing the driver and the passenger.
डॉ. सायरस पूनावाला यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर –
डॉ. सायरस पूनावाला यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर