आयकर विभागाच्या पोर्टलमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी वित्तमंत्रालय आणि इन्फोसिस अधिकाऱ्यांची बैठक!

नवी दिल्ली : आयकर विभागाच्या (Income Tax Department)नवीन ई-फायलिंग संकेतस्थळाशी (website) संबंधित तांत्रिक अडचणी अजूनही संपतच नाहीत. याबाबात वित्तमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister Nirmala Sitharaman)यांनी गेल्या आठवड्यातच ही वेबसाइट विकसित करणाऱ्या कंपनीला (Infosys) तांत्रिक अडचणी दूर करण्याचे म्हटले आहे. तथापि, या पोर्टलचे काही फिचर्स कार्य न करण्याच्या तक्रारी अजूनही येत आहेत. हे पाहता वित्तमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी २२ जून रोजी Infosys च्या अधिकाऱ्यांसह एक बैठक घेतील.

या बैठकीत आयकर विभागाच्या E-Filing पोर्टलशी संबंधित मुद्द्यांबाबत आणि अडचणींवर चर्चा होईल. आयकर विभागाच्या नवीन पोर्टल संदर्भात होणाऱ्या या बैठकीत आयसीएआय सदस्य, लेखा परीक्षक, सल्लागार आणि करदात्यांसह इतर सर्व भागधारक यामध्ये भाग घेतील. नवीन पोर्टलमध्ये अनेक प्रकारच्या तांत्रिक त्रुटी आणि अडचणी आढळून आल्या आहेत. यामुळे करदात्यांना अनेक प्रकारच्या गैरसोयींचा सामना करावा लागला आहे. सरकारने संबंधित भागधारकांना पोर्टलशी संबंधित समस्या लेखी स्वरूपात घेण्यास सांगितले आहे.

वित्त मंत्रालयाद्वारे जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, इन्फोसिस संघाचे प्रतिनिधी प्रश्नांची उत्तरे देण्यास, विविध समस्या आणि त्रुटी स्पष्ट करण्यास, करदात्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यास तसेच इनपुट प्राप्त करण्यासाठी उपलब्ध राहतील.
Officials of Finance Ministry, Infosys will meet on June 22, will be discussed on the new portal of income.


कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान सरकारी तिजोरीवर फारसा विपरीत परिणाम नाही –

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सरकारच्या तिजोरीवर कोणताही विपरित परिणाम नाही : एसबीआय अहवाल

Social Media