नवी दिल्ली : वित्त मंत्रालयाने स्वित्झर्लंडमध्ये भारतीयांद्वारे ठेवलेल्या कथित काळ्या पैशांसंदर्भांत अलिकडेच माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचे खंडन केले आहे. मंत्रालयाने शनिवारी ट्विटद्वारे ही बाब स्पष्ट केली आहे. मंत्रालयाने सांगितले की, स्विस बँकांमधील जमा ठेवींतील घट किंवा वाढीची पडताळणी करण्यासाठी स्विस अधिकाऱ्यांकडून माहिती मागविण्यात आली आहे.
मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रक जारी करून सांगितले आहे की, शुक्रवारी माध्यमांवर अनेक असे अहवाल प्रकाशित झाले, ज्यात म्हटले होते की स्विस बँकांमध्ये जमा असलेला भारतीयांचा पैसा सन २०२० च्या अखेरीस वाढून २०,७०० कोटी रूपये इतका झाला आहे, जो सन २०१९ च्या अखेरीस ६,६२५ कोटी रूपये होता. अहवालात म्हटले होते की, दोन वर्षांच्या घसरत्या ट्रेंडच्या उलट या दरम्यान स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये वाढ झाली आहे. असेही म्हटले आहे की ही गेल्या १३ वर्षांतील सर्वांत मोठी ठेवी आहे.
देशाच्या विदेशी चलन साठ्यात ६०० अब्ज डॉलर्सचा विक्रम
मंत्रालयाने पुढे सांगितले की, मीडिया अहवाल या वस्तूस्थितीकडे इशारा करत आहे की नोंदणी केलेली आकडेवारी बँकांद्वारा स्विस नॅशनल बँकेला (SNB) सांगितलेली अधिकृत आकडेवारी आहे आणि ही आकडेवारी स्वित्झर्लंडमध्ये भारतीयांद्वारा ठेवलेल्या काळ्या पैशांचे प्रमाण दर्शवित नाही. याव्यतिरिक्त आकडेवारीत त्या पैशांचा देखील समावेश नाही, जे भारतीय, अनिवासी भारतीय (एनआरआय) किंवा अन्य लोकांद्वारे स्विस बँकांमध्ये तिसऱ्या देशातील संस्थांच्या नावाने ठेवलेले असू शकतात.
मंत्रालयाने पुढे सांगितले की, ‘ग्राहकांद्वारे जमा केलेली राशी वास्तविक सन २०१९च्या अखेरीस घटली आहे. विश्वासू संस्थांच्या माध्यामातून ठेवलेला पैसा देखील २०१९ च्या अखेरीस निम्म्याहून अधिक शिल्लक राहिला आहे. सर्वात मोठी वाढ “ग्राहकांकडून थकीत इतर राशी ”मध्ये आहे. हे बाँड्स, सिक्युरिटीज आणि इतर अनेक वित्तीय साधनांच्या रूपात आहेत.’
कोरोनामुळे विमान क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान –
मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, भारत आणि स्वित्झर्लंड करविषयक बाबींमध्ये परस्पर प्रशासकीय सहायतावर बहुपक्षीय अधिवेशनाचे स्वाक्षरकर्ता आहेत आणि दोन्ही देशांनी बहुपक्षीय सक्षम प्राधिकरण करारावर(एमसीएए) स्वाक्षरी देखील केली आहे. त्यानुसार दोन्ही देशांच्या दरम्यान सन २०१८ पासून वार्षिक आर्थिक खात्याची माहिती सामायिक करण्यासाठी सूचनांची स्वयंचलित देवाण-घेवाण होत आहे.
विशेष म्हणजे काँग्रेसने शुक्रवारी स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवी वाढल्याच्या वृत्तामुळे सरकारवर घेराव घातला होता. पक्षाने शुक्रवारी म्हटले होते की, सरकारने श्वेतपत्र घेऊन देशवासीयांना सांगावे की हे पैसे कोणाचे आहेत आणि विदेशी बँकांमध्ये जमा काळा पैसा परत आणण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत?
Finance Ministry refutes reports of increase in deposits of Indians in Swiss Banks, know what to say.
कोरोनाचा विमान क्षेत्राला चांगलाच फटका
कोरोनाचा विमान क्षेत्राला चांगलाच फटका, एप्रिलच्या तुलनेत मे मध्ये 63 टक्क्यांची मोठी घसरण!