यावर्षी भारतातील इंधन मागणीत 11.5 टक्के घट होण्याची शक्यता : फिच सोल्युशन्स

नवी दिल्ली :  रेटिंग एजन्सी फिच सोल्युशन्सने भारताच्या इंधन मागणीत घट होण्याची शक्यता वर्तविली आहे. फिच सोल्युशन्सचा अंदाज आहे की सन 2020 मध्ये भारताची इंधन मागणी 11.5 टक्क्यांनी कमी होऊ शकते. इंधन मागणीच्या अंदाजातील घट ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी निश्चितच चांगली चिन्हे नाहीत. भारताच्या आर्थिक परिस्थिती कमकुवत झाल्याने फिचने देशाच्या इंधन मागणीत घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

रेटिंग एजन्सीच्या अर्थशास्त्रज्ञांनी चालू आर्थिक वर्षात म्हणजेच  2020-21 मध्ये देशातील वास्तविक जीडीपी (रिअल जीडीपी) मध्ये 8.6 टक्के मंदीचा अंदाज वर्तविला आहे. यापूर्वी त्यांनी देशाच्या जीडीपीत 4.5  टक्के मंदी असल्याचे भाकीत केले होते.

रेटिंग एजन्सीने शनिवारी एक निवेदन जारी केले. त्यानुसार देशाच्या इंधन मागणीवर व्यापक परिणाम झाला आहे आणि औद्योगिक आणि ग्राहक या दोन्ही प्रकारच्या इंधनाची मागणी कमी झाली आहे. यापूर्वी रेटिंग एजन्सीने यावर्षी देशाच्या इंधन मागणीत  9.4 टक्के कमतरता असल्याचे भाकीत केले होते, परंतु देशाचा आर्थिक दृष्टीकोन कमकुवत झाल्यानंतर फिचने हा अंदाज वाढविला आहे.

फिच सोल्यूशननुसार 2021 आणि 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था पाच टक्क्यांनी वाढेल. एजन्सीच्या मते, महामारी नियंत्रित झाल्यावर आर्थिक उलाढाल वाढेल. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या जीडीपीत मंदी 23.9 टक्क्यांनी घसरली आहे. या कालावधीत, कोरोना विषाणूच्या साथीचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात टाळेबंदीमुळे औद्योगिक क्रियेवरील तीव्र परिणामांमुळे मंदी दिसून आली.

 

Social Media