‘उडान’ योजनेअंतर्गत जळगावला विमानसेवा सुरू

जळगाव : देशभरातील महत्त्वाच्या शहरांतून होत असलेली हवाई वाहतूक मर्यादित असून सर्वसामान्यांनाही विमान सेवेचा लाभ मिळावा, विमान सेवेचा विस्तार व्हावा, असा विचार करून केंद्र शासनाने ‘आम आदमी’साठी ‘उडान’ ही योजना सुरू केली असून शासनाने हवाई वाहतुकीवरील निर्बंध उठवल्याने कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षभरापासून आठवड्यातून तीनच दिवस सुरू असणारी जळगाव ते मुंबई विमानसेवा या आठवड्यातून पाच दिवस सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे आठवड्यातून तीन दिवस कोल्हापूर तर दोन दिवस नांदेड मार्गावर ही विमानसेवा सुरू आहे . दरम्यान , कोल्हापूर येथील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर व नांदेड हे शहर व्यापार, उद्योगसह शीख बांधवांचे धार्मिक स्थळ या ठिकाणी असल्यामुळे वरील दोन्ही शहरे मुंबई विमानसेवेसोबत जोडली असल्याने खान्देशवासीयांना पर्यटन व व्यापाराच्या दृष्टीने फायदा होणार असल्याची माहिती विमानतळ संचालकांनी दिली आहे.

जळगाव विमानतळावरून उड्डाण योजने अंतर्गत विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. शासनाने कोरोनाच्या कठीण काळात हवाई वाहतुकीवरील निर्बंध आता उठविले आहेत. त्यामुळे जळगावला विमानसेवा पुरविणाऱ्या कंपनीतर्फे आठवड्यातून पाच दिवस मुंबईची विमानसेवा सुरू आहे. या मध्ये दर सोमवारी, बुधवारी व शुक्रवारी कोल्हापूरची विमानसेवा सुरू झाली आहे तर मंगळवार व गुरुवार नांदेडची सेवा सुरू झाली आहे. मुंबई ते जळगाव हा प्रवास करण्यासाठी 12 तास वेळ लागत होता. विमानसेवा सुरू झाल्यामुळे वेळेची मोठया प्रमाणावर बचत होत असून विद्यार्थ्यांना आणि व्यापाऱ्यांना याचा मोठा फायदा होत असल्याने हा शासनाचा स्तुत्य उपक्रम असून प्रवाश्यांनी विमानसेवा सुरू केल्याबद्दल शासनाचे आभार मानले आहेत.

Social Media